ठळक बातम्या

वारसाने संपत्ती मिळते, पक्ष नाही – देवेंद्र लांबे पाटील

राहुरी येथे शिवसैनिकांकडून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

राहुरी – हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न्याय मिळाला असून शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचा शिवसेना पक्ष अधिकृत असल्याची घोषणा झाल्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांनी राहुरी शहरात एकत्रित येत फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

या प्रसंगी देवेंद्र लांबे पाटील म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून निकाल देत धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह देखील दिलेले आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचे खरे वारसदार म्हणून एकनाथ शिंदे यांना न्याय मिळाला आहे. वारस हक्काने कुटुंबाची संपत्ती मिळू शकते. पण, राजकीय पक्ष नाही, हे आजच्या निकालाने सिद्ध झाले आहे. या लागलेल्या निकालामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांना शिर्डी लोकसभेचे जलदूत खा.सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात आणखी जोमाने जनतेची सेवा करण्यासाठी बळ मिळणार आहे.

यावेळी राहुरी तालुका संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, कार्याध्यक्ष रोहित नालकर, संघटक महेंद्र उगले, शिवदूत महेंद्र शेळके, दादा पटारे, सागर थोरवे, प्रसिद्धी प्रमुख बाप्पुसाहेब काळे, शुभम भोंगळ, विजय पटारे, संकेत शेलार, दत्तात्रय काळे, अविनाश क्षिरसागर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button