अहमदनगर

गणेशराव मुदगुले यांनी पदभार स्वीकारला

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष पदाचा पदभार गणेशराव मुदगुले यांनी सोमवारी तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे जाऊन स्वीकारला. त्यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी संजय गांधी योजना नायब तहसीलदार अभया राजवाळ, अ.का.श्रीमती निर्मला नाईक, संगणक ऑपरेटर रज्जाक बागवान, नवनाथ मंडलिक आदी उपस्थित होते.

यावेळी श्री मुदगुले यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह विविध योजनेची सविस्तर चर्चा करून माहिती घेतली व आढावा घेतला. ना. तहसीलदार श्रीमती अभया राजवाळ यांनी सविस्तर माहिती देताना संजय गांधी निराधार योजनेसह, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/ विधवा/ अपंग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य निवृत्ती वेतन योजना, व श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनाची माहिती दिली व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असावीत त्याचे तपशिलासह माहितीपत्रक सादर केले.

यावेळी श्री. मुदगुले म्हणाले की, महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांनी आमच्यावर विश्वास ठेवून शिरसगावसह वरील योजनेच्या तालुकाध्यक्षपदी माझी नियुक्ती केल्याने दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडीन व सामान्य जनतेपर्यंत शासकीय सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. यापुढे सर्व प्रकरणांचा निपटारा, प्रलंबित न राहता दर महिन्याला बैठक घेऊन आलेल्या सर्व अर्जांचा विचार करून नागरिक योजना लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button