ठळक बातम्या

झुंजार रणरागिणीला भेटावे म्हणुन लोणीत आलो – खा.संजय राऊत

लोणी – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव साहेब यांच्याशी चर्चा झाली. कृषीभुषण प्रभाताई घोगरे यांचा संघर्ष आहे. या झुंजार रणरागिनीला भेटण्यासाठी लोणीत आलो आहे. डोक्यात काही नसते, मात्र लढवय्या लोकांचा शोध घेत असतो असे शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी सांगितले.

शिर्डी येथे साई दर्शनानंतर खा.संजय राऊत यांनी लोणी खुर्द येथील कृषीभुषण प्रभाताई घोगरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी खा. राऊत यांनी सर्व प्रथम त्यांनी शिर्डी मतदार संघाचे पहिले आमदार स्वर्गीय चंद्रभान (दादा) घोगरे पाटिल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस आभिवादन केले.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना खा. राऊत म्हणाले महाराष्ट्र वाचवायला हवा, प्रतिष्ठा धुळीला मिळवायचे काम होत असेल तर लढवय्ये लोकांना भेटावे लागते, आपलेचं लोक लुटत असुन आता शेजारच्या राज्यात लुटेरे होत आहे. अनेक दिवसांपासून प्रभाताई घोगरे यांचा संघर्ष पहातोय गणेश साखर कारखाना त्यांनी जनतेसाठी मिळवला. ती एक लुट थांबण्याचाचं प्रयत्न आहे. खोटे गुन्हे दाखल करायचे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना तुरंगात टाकयचे ही गुंडशाही, दडपशाही, झुंडशाही सुरु आहे, हे आम्ही चालु देणार नाही असे सुनावत २०२४ ला देशात व राज्यात परिवर्तन होणार असुन या जिल्हातील परिवर्तनाची सुरुवात लोणी गावातुनचं होईल असे संजय राऊत यांनी सांगितले.

यावेळी लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे, एकनाथ घोगरे, डाॅ एकनाथ गोंदकर, कृषीभुषण प्रभाताई घोगरे, आर्चना आहेर, शांता आहेर, सचिन कोते, बी.के विखे, श्रीकांत मापारी, आनिल आहेर, साजन पाचपुते, संजय आप्पा शिंदे, आबासाहेब आहेर, राजेंद्र आहेर, दिलीप घोगरे, दिलीप आहेर, चांगदेव घोगरे, विनायक चौधरी, विजय मगर, आशोक आहेर, दिपक घोगरे, भास्कर आहेर, आनिल थेटे, विलास गुळवे, उत्तमराव घोरपडे, सौरभ शेळके, राधु राऊत, संजय आहेर, सुहास आहेर, सचिन आहेर, ऋषिकेश आहेर, वैभव घोगरे यांच्यासह ग्रा.प, सेवा संस्थेचे सर्व सदस्य, गावातील तरुण कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button