अहमदनगर

अंगणवाडी सेविका-मदतनीस आंदोलनाला ‘स्वराज्य’ चा पाठिंबा

संगमनेर शहर : अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियन ने सोमवार दि. 8 जानेवारी 2024 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर मागण्यांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याच्या दिलेल्या बेकायदेशीर नोटिसा मागे घ्या या मागणीसाठी जि.प.अहमदनगर येथे त्यांच्या मागण्यासाठी भव्य मोर्चा काढला होता.

अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा प्रश्न तात्काळ सोडवून शासनाने योग्य भूमिका घेऊन सेविका मदतनीस यांना न्याय द्यावा यासाठी स्वराज्य पक्षाने यात उडी घेत जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी बोलताना स्वराज्य पक्षाचे इंजि. आशिष कानवडे यांनी सरकार वर तोफ डागत कडक भाषेत टीका केली. सरकारच कुठलं ही काम असो पहिली आठवण होते ती सेविका मदतनीस यांची कोव्हिड काळात जगाला आदर्श अस काम महाराष्ट्र राज्यातील सेविका, मदतनीस, आशा सेविकांनी केले असेही कानवडे यांनी सांगितले.

पण आता त्यांना देण्याची वेळ आली तर सरकार वेळ काढूपणा करतंय. शेवटी बोलतांना सेविकांना आश्वासीत केले की स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे आपल्या सोबत आहेत राज्य सरकार कडे आपली व्यथा मांडण्यासाठी लवकरच कर्मचारी व स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची बैठक लावून मागण्या मान्य करण्यासाठी स्वराज्य कटिबद्ध राहील असे सांगितले.

तसेच निलेश पवार यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना आश्वासीत केले की तातडीने बैठक होऊन सरकार दरबारी तुमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी स्वराज्य प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी सुरेश कालडा, साईनाथ बोराटे, दीपक चांदणे, साहिल गडाख, आकाश चतुर्भुज, विनोद कोकणे, सचिन कानवडे, राहुल कानवडे, ओंकार डोंगरे, आदित्य बढे आदी कार्यकर्ते व आंदोलनकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button