हरेगाव येथे नाताळनिमित्त विविध कार्यक्रम
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव संत तेरेजा चर्च येथे नाताळनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा. रांगोळी स्पर्धा, रात्री १० वा. नाताळगीते, १०:५० वा. पवित्र संगीत मिस्सा, दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. पवित्र मिस्सा, दि. २६ डिसेंबर रोजी रक्तसाक्षी संत स्टीफन स्मृतिदिन, सायंकाळी ६ वा. नाताळ गीत स्पर्धा, दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. वृद्ध भाविकांसाठी पवित्र मिस्सा, व बाबासाहेब सोनावणे प्रितीभोजन, दि २८ डिसेंबर रोजी निष्पाप बालक दिन व सायंकाळी ५ वा.कॅण्डल मिरवणूक, दि २९ डिसेंबर रोजी संत बेकेट स्मृतिदिन, दि ३१ डिसेंबर रोजी पवित्र कुटुंबाचा सण, ७:३० वा. पवित्र मिस्सा [संत लुक विभाग] ९:३० पवित्र तास, रात्री १०:३० वा. पवित्र संगीत मिस्सा, दि. १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वा. पवित्र संगीत मिस्सा, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी व सर्व धर्मभगिनी, ग्रामस्थ यांनी केले आहे. तसेच दि. २३ डिसेंबर रोजी संत तेरेजा बॉईज हायस्कूलचे प्राचार्य फा. डॉमनिक रोझारिओ हे सेवानिवृत्त होत असून त्यांचा सेवापूर्ती सोहळा महागुरुस्वामी लूरडस डानियल व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी केले आहे.