अहमदनगर

राष्ट्रभक्ती आणि संस्कृती शक्तीची शिकवण देणारी ‘श्यामची आई’ प्रत्येक घरात असावी – डॉ. उपाध्ये

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पूज्य साने गुरुजी हॆ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि संस्कृती विचारांचे आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांनी 1935 मध्ये ‘श्यामची आई’ हॆ पुस्तक लिहिले. राष्ट्रभक्ती आणि संस्कृती शक्तीची आदर्श शिकवण देणारी ‘श्यामची आई’ प्रत्येक घरात असावी अशी अपेक्षा ग्रामीण साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केली.

देवळाली प्रवरा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळ अंतर्गत असलेल्या ‘ज्ञान विज्ञान वाचन’ मार्फत आयोजित ‘शयामची आई’ या विषयावर ग्रंथ अन्वेषक म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. प्राचार्या सौ. स्वाती हापसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय केंद्र कार्यवाह प्रा. रागिणी टेकाळे यांनी करून दिला.

यावेळी प्रा. अविनाश मेहेत्रे, प्रा. सतीश कटके, प्रा. संतोष गुंड, प्रा. दादा बंडगर, प्रा. राणी खळेकर आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ज्ञान विज्ञान वाचक चळवळ ही वाचन संस्कृती वाढविणारी असून ती जोपासली पाहिजे असे सांगून प्राध्यापकांना आपली पुस्तके भेट दिली.

ते पुढे म्हणाले, ‘श्यामची आई’ यशोदामाता ही भारतीय संस्कृती विचारांची वाहक आहे. कुटुंबप्रेम, विश्वास, दयाभाव, निसर्ग, पशू, पक्षीप्रेम, समर्पणवृत्ती असे विविध विचार संदर्भ कथा सांगत कविता सादर केली. सूत्रसंचालन कु. यशश्री लाटे यांनी केले तर प्रा.रागिणी टेकाळे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button