कृषी

आय.आय.टी. मुंबई येथील पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापकांची कास्ट प्रकल्पाला भेट

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे जागतिक बँक अर्थसहाय्यित, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील तसेच संशोधन संचालक व कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.

या प्रकल्पांतर्गत विकसित केलेले विविध डिजिटल व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पाहण्यासाठी नेहमीच देशभरातून शास्त्रज्ञ व विद्यार्थी येत असतात. या प्रकल्पात विकसीत केलेले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी इंडियन इन्सटिटयूट ऑफ टेक्नॉलोजी मुंबई येथील 32 पदव्युत्तर आणि शास्त्रज्ञांनी नुकतीच कास्ट प्रकल्पास भेट दिली. या प्रसंगी कास्ट प्रकल्पाचे सह-प्रमुख संशोधक डॉ. मुकूंद शिंदे आणि आय.आय.टी. मुंबईचे प्राध्यापक डॉ. परमेश्वर उदमले, कास्ट प्रकल्पाचे संशोधन सहयोगी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मुकूंद शिंदे यांनी कास्ट प्रकल्पाविषयी आणि कास्ट प्रकल्पाअंतर्गत विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. कास्ट प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ड्रोन व रोबोटिक्स प्रयोगशाळा याबद्दल इंजि. नीलकंठ मोरे विद्यार्थ्यांना माहिती दिली. स्मार्ट पीआएस स्वयंचलित पंप प्रणाली आणि सेन्सर आहारित सिंचन प्रणाली, हवामान अद्ययावत केंद्र व बाष्पीभवन मापक आणि हायपरस्पेट्रल इमेजी प्रयोगशाळा विषयी सविस्तर माहिती डॉ. वैभव मालुंजकर यांनी दिली आणि ऑटोपीअस याविषयी डॉ. देवर्श भानू यांनी दिली.

या भेटी दरम्यान कास्ट प्रकल्पातील सदस्य, संशोधन सहयोगी आणि इतर कर्मचारी यांनी चर्चा करून भेट देणार्या संशोधक व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी कास्ट प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर भेटीचे नियोजन करण्यात आले होते. डॉ. शुभांगी धाडगे यांनी भेटीचे संपूर्ण नियोजन व आयोजन केले तसेच सर्वांचे आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button