धार्मिक

महात्मा बसवेश्वर हॆ विकसित मानवाचे एक परमदर्शनीय रुपच होय – ह.भ.प. प्रा. सखाराम कर्डिले महाराज

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : विश्वमानव महात्मा बसवेश्वरांनी माणूस हाच आपल्या जीवितकार्याचा केंद्रबिंदू मानला. त्यामुळेच त्यांच्या आर्थिक, नैतिक व शैक्षणिक समस्यांचाही विचार केला. मानवावरील अत्यंतिक निष्ठाच बसवेश्वरांना परमेश्वरापर्यंत नेऊ शकल्या. माणसातील ईश्वर या महात्म्याने जाणले. असे श्रीबसवेश्वर हॆ विकसित मानवाचे एक परमदर्शनीय रुपच होते असे बसवेश्वरांचे मानव विचार ह.भ.प. प्रा. सखाराम कर्डिले महाराज यांनी व्यक्त केले.

येथील बोरावकेनगरमधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान कार्यालयात वीरशैव लिंगायत समाज परिसंवाद, प्रवचन कार्यक्रमात ह.भ.प प्रा. कर्डिले महाराज बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीरामपूर लिंगायत समाज अध्यक्ष संदेश शाहीर होते. प्रतिमा पूजन, सत्कार सोहळा झाला. स्वागत, परिचय, प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी केले. डॉ. प्रकाश मेहकरकर, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

ह.भ.प. कर्डिले महाराज पुढे म्हणाले, सुखदेव सुकळे हॆ अनेक वर्षांपासून समाजोपयोगी कार्य करीत आहेत. सेवानिवृत्तीनंतर या कार्याला अधिक गती आणि वेळ मिळत आहे. सेवेचे व्रत अंगीकारून त्यानुसार भक्तीशील उपक्रम होत आहेत. याप्रसंगी डॉ. अर्जुन आनंदकर, सुभाष लिंगायत, सुरेश बुरकुले, बाळासाहेब बुरकुले, संजय बुरकुले, सुरेखा बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, संजय कल्याणकर, जालिंदर निकडे, आरोग्यमित्र भीमराज बागुल, नितीन बुरकुले, सुबोध बुरकुले आदी उपस्थित होते. उज्वलाताई बुरकुले यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button