धार्मिक

हरेगाव येथे संत तेरेजा यांचा उत्सव साजरा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव मतमाउली भक्तिस्थान येथे संत तेरेजा यांचा सण भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रमाने संत तेरेजा उत्सव संपन्न झाला. यावेळी हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा डॉमनिक यांनी सांगितले की, आज बाळ येशूची संत तेरेजा हिचा सण, संत तेरेजा ही हरेगाव धर्मग्रामाची आश्रयदाती संत आहे. तसेच नासिक धर्मप्रांतची आश्रयदाती संत आहे. मिशनची कैवारिणी या नावाने प्रचलित आहे. प्रामुख्याने संस्थेत आपले पूर्ण जीवन समर्पित केले आहे.

प्रर्थनामय जीवनाव्दारे व नम्रता या सुंदर गुणाव्दारे तिला रत्न्मंडीत केले होते. तिचे पूर्ण आयुष्य परमेश्वराच्या सेवेसाठी तिने व्यतीत केले आहे. प्रामुख्याने चार भिंतीच्या आत पूर्ण जगासाठी प्रार्थना करीत विशेषकरून जे धर्मगुरू, धर्मभगिनी मिशनरी कार्यात प्रेषित कार्य करीत आहेत त्यांचेसाठी मनोभावी प्रार्थना करीत असे. नम्रता व त्याचबरोबर साधेपणा व प्रर्थानामय जीवन याव्दारे पूर्ण जगात तिचे नावलौकिक झाले. तिच्या मध्यस्थीव्दारे अनेक भाविकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. अशीच मध्यस्थी सर्वांसाठी करावी.

याप्रसंगी धर्मगुरू, धर्मभगिनी यांच्या हस्ते केक कापून सण साजरा झाला. त्यावेळी संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिका ज्योती गजभिव यानाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. येथील सर्व युवक युवतींनी देखाव्याचे नृत्य सादर केले. त्यासाठी फा. सचिन मुन्तोडे, रिचर्ड, श्रीमती शिल्पा पठारे व सहकारी यांनी सहकार्य केले. हा आनंद व्दिगुणित करताना धर्मगुरूंनी देवाचे आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button