श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ३० जून रोजी शिरसगाव सोसायटीची १०० टक्के वसुली झाली, ही एक आनंदाची बाब असून संस्थेची प्रगतीकडील वाटचाल गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी अविनाश आदिक यांनी यावेळी केले.
तालुक्यातील शिरसगाव येथील सोसायटीची ७१ वी वार्षिक सर्व साधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी किशोर पाटील हे होते. सोसायटी सभासदांना १० टक्के लाभांश संस्थेचे चेअरमन किशोर पाटील यांनी जाहीर केला व दिवाळीपूर्वी वाटप करण्यात येणार आहे. यावेळी चेअरमन किशोर पाटील यांनी प्रास्तविक केले. सचिव सुभाष यादव यांनी सभेचे अहवाल वाचन करून सर्व विषय सांगितले. पत्रिकेवरील सर्व विषय व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
यावेळी इंडियन मेडिकल असो च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ रवींद्र कुटे, सौ कुटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्य पतसंस्था फेडरेशनवर निवड झाल्याबद्दल सिद्धिविनायक पतसंस्था चेअरमन वासुदेव काळे यांचा सत्कार करण्यात आला. मर्चंट बँक संचालकपदी निवड झाल्याबद्दल गौतम उपाध्ये यांचा, अविनाश आदिक व जेष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सहकारातील जेष्ठ उत्तमराव पवार, सी वाय पवार, लहानू नाईक, भास्करराव लिपटे, शंकरराव आढाव, ज्ञानेश्वर मुरकुटे, पी आर शिंदे, शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, जितेंद्र भोसले, कैलास बोर्डे, सुनील थोरात, हंसराज आदिक, यशवंत लवांडे, तसेच जेष्ठ सभासद यांचा सत्कार करण्यात आला.
सभेत संस्थेचे नामांतर श्री जी के पाटील विविध कार्यकारी सोसायटी असे करावे असा ठराव दिनकर यादव यांनी मांडला. त्यास सत्यनारायण उपाध्ये यांनी अनुमोदन दिले. तो मंजूर झाला. जेष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुरेश ताके आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्था उपाध्यक्ष सुभाष बोंबले, साईनाथ गवारे, सोपानराव गवारे, रामचंद्र पाटील, संजय रामदास गवारे, नवनाथ ताके, शंकरराव गायकवाड, गणेशराव मुदगुले, दिनकर यादव, माधवराव पवार, शशिकांत गवारे, बाळासाहेब गवारे, भाऊ गवारे, सुभाष यादव, संदीप रोकडे, संदीप गवारे, सतीश गवारे, विजय गायकवाड, विश्वनाथ गवारे आदी उपस्थित होते. चांगदेव बकाल यांनी आभार प्रदर्शन केले.