अहमदनगर

महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कानवडे, उपाध्यक्षपदी इंगळे

अभियंता दिवस साजरा

संगमनेर शहर – येथील सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, संगमनेर येथे 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे होते तर उपअभियंता शाम मिसाळ, महावितरणचे उपअभियंता पी.पाटील, महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष इंजि.संजय शिंदे, सचिव शैलेंद्र गाडेकर, इंजि.हरीचंद्र चकोर, इंजि.बंड, जाधव, संजय साळुंके, संजय कडलग, गिरीष शेपाळ, सुधीर कातोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महाराष्ट्र इंजिनियर्स असो.संगमनेर ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्ष पदी आशिष कानवडे, उपाध्यक्षपदी देवेंद्र इंगळे, सचिव पदी प्रतीक वाकचौरे, अजिंक्य वर्पे, संघटक पदी अनिल चव्हाण, कोषाध्यक्षपदी कोंडाजी कढनर आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या निवडीबद्दल मान्यवरांनी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील तरुण अभियंता मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button