धार्मिक

९ व १० सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवी मतमाउली यात्रा महोत्सव

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील संत तेरेजा चर्च हरेगाव येथील मतमाउली भक्तिस्थान येथे सालाबादप्रमाणे व यावर्षी ९ व १० सप्टेंबर रोजी मतमाउली यात्रेचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

यात्रेपूर्वी नउ शनिवारी नोव्हेना झाली. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी रा रे डॉ.लूरडस डांनियल यांच्या हस्ते ध्वजारोहण व यात्रा शुभारंभ झाला. ३१ ऑगस्ट पासून यात्रेपर्यंत दहा दिवस सायंकाळी विविध विषयांवर पवित्र मारियेच्या जीवनावर विविध धर्मगुरू प्रवचन करीत आहेत. दि ७ फा.अंतोन डिसोझा “पवित्र मारिया ख्रिस्त सभेतील प्रेषितीय कार्य” दि. ८ फा.जेरोल्ड रिबेलो “पवित्र मारिया नम्रतेचा परमोच्च आदर्श” दि. ९ सप्टेंबर रोजी यात्रा महोत्सवदिनी सकाळी मिस्सा, सकाळी ८.३० वा. पवित्र जपमाळ व नोव्हेना व विधिवत स्थानिक धर्मगुरू यांच्या हस्ते मतमाउली मूर्तीवर मुकुट चढविण्यात येईल व भाविकांचा दर्शन रांगेचा शुभारंभ होईल.

तासातासाला विविध धर्मगुरू यांचे मिस्सा बलिदान, सायंकाळी ४.३० वा. प्रमुख याजक मुंबई सरधर्मप्रांत कार्डिनल ऑझवर्ल्ड ग्रेशियस यांचे “पवित्र मारिया विश्वाची राणी” या विषयावर महागुरुस्वामी नासिक लूरडस डानियल यांच्या उपस्थितीत असंख्य भाविकांसमोर प्रवचन होणार आहे. रविवारी १० सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वा. फा. पीटर डिसोझा यांचे पवित्र मिसा बलिदान व दि १० व ११ रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हरेगाव प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारीओ यांनी दिली.

या अमृत महोत्सवास सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन फा.डॉमनिक, सचिन, रिचर्ड, व सर्व धर्मभगिनी, चर्च संलग्न संघटना, हरेगाव उंदिरगाव ग्रामस्थ यांनी केले आहे. त्याच प्रमाणे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. यात्रा नियोजित आयोजन प्रमाणे होणार असून तहसीलदार श्रीरामपूर, पोलीस प्रशासन, श्रीरामपूर नगरपालिका, ग्रामपंचायत हरेगाव, उंदीरगाव, आरोग्य विभाग, महावितरण, एस टी विभाग बसेस,आदींच्या पूर्ण सहकार्याने यात्रा दरवर्षीपेक्षा अधिक उत्साहात पार पडेल असे प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ यांनी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button