४ ते ११ सप्टेंबर पर्यंत शिरसगाव येथे अखंड हरीनाम सप्ताह
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे साई प्रतिष्ठान, विठ्ठल मंदिर महादेव मंदिर ट्रस्ट आदींच्या वतीने दि ४ ते ११ सप्टेंबर पर्यंत अखंड हरीनाम सप्ताह, श्री शिवपुराण कथा व श्री साई सतचरीत पारायण सोहळा विठ्ठल मंदिर शिरसगाव येथे आयोजित केला असून कथाव्यास ह.भ.प.बालयोगी ऋषिकेश महाराज गोंधवणी यांच्या अधिपत्याखाली पारायण नेतृत्व सौ वैशाली कदम, सौ आरती बकाल, सौ अंजली यादव हे करणार आहेत.
सकाळी ८ ते ११ वा. श्री साई चरीत्र पारायण, रात्री ६ ते ९ वा. रोज शिवपुराण कथा होईल. दि. ४ सप्टेंबर – शिवपुराण महात्म्य, दि. ५ – शिवलिंग महिमा वर्णन, दि ६ – सती चरित्र व पार्वती चरित्र, दि ७- कार्तिक व गणेशजी चरित्र, दि ८- दैत्याधीकांचा वध, दि ९- शिव व्रतादी कथा ज्योतिर्लिंग महिमा, दि १०- शिवमंत्र नाम महिमा व ग्रंथ पूजन, सायंकाळी ५ वा साई चरित्र ग्रंथ मिरवणूक, दीपोत्सव, दि ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. ह.भ.प. बालयोगी ऋषिकेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होणार आहे. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.