धार्मिक

परमेश्वराच्या शब्दाची पूर्तता करून पवित्र मारीयेप्रमाणे आपले जीवन जगावे – फा.कोशाव

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव संत तेरेजा मतमाउली भक्तिस्थान येथे अमृत महोत्सवी मतमाउली यात्रापूर्व तिसरे नोव्हेनाचे पुष्प नासिक येथील फा.संदीप कोशाव यांनी ‘पवित्र मारिया आणि दैवी पाचारण’ या विषयावर गुंफताना म्हणाले की, परमेश्वर प्रत्येक माणसाला आमंत्रित करत असतो. त्याचे शब्द ऐकण्यासाठी मनन चिंतन करण्यासाठी व स्वत:ची जीवनशैली बदलण्यासाठी असतात. हे पाचारण जे असते ते प्रत्येक माणसाला होत असते. त्याचेसाठी आपले कान उघडणे, मन उघडणे, व देवाचे शब्द ऐकणे हे महत्वाचे आहे.

आजच्या प्रभू शब्दात ऐकणार आहोत की मारियाने देखील या दैवी शब्दाला होकार दिला व ती म्हणाली तुझ्या इच्छेप्रमाणे होवो आणि परमेश्वराच्या शब्दाची पूर्तता मरीयेचे जीवनात झाली. आपल्या जीवनात देखील परमेश्वराच्या शब्दाची पूर्तता करणे आणि त्याला अनुसरून एक चांगले जीवन जगणे महत्वाचे व अगत्याचे आहे. पवित्र मरीयेकडे प्रार्थना करीत असताना मला परमेश्वर बोलवीत आहे. त्याचे शब्द ऐकून शब्दावर मनन चिंतन करून स्वत:चे जीवन बदलू शकतो का हे न्याहाळणे गरजेचे आहे.

आजच्या या नोव्हेनाच्या दिवसात आपण त्याचेसाठी पवित्र मरीयेकडे विशेष प्रार्थना करू या व तिचे सहाय्य व सामर्थ्य मागू या. जेणेकरून दैवी पाचारणाला उत्तम प्रकारे होकार देऊन देवाचे कार्य या जगात होईल मानव जातीसाठी आपल्या जीवनाचे समर्थन करता येईल. या नोव्हेना प्रसंगी हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, ज्यो गायकवाड, संजय पंडित, संपत भोसले आदी सहभागी झाले होते.

दि ३ सप्टेंबर रोजी फा. विशाल त्रिभुवन यांचे “पवित्र मारिया ख्रिस्ताची परिपूर्ण शिष्या” या विषयावर प्रवचन झाले. ४ सप्टेंबर रोजी बाल येशू चर्च नासिक येथील धर्मगुरू यांचे “पवित्र मारिया नितीमत्वासाठी छळ सहन करणाऱ्याची सहाय्यकारिणी” या विषयावर प्रवचन होणार आहे. यात्रेपर्यंत रोज सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मागणी केलेप्रमाणे महावितरणने वीज पुरवठा पूर्ववत केल्याबद्दल प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक, सुभाष पंडित, ज्यो दिवे आदींनी धन्यवाद दिले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button