धार्मिक

पवित्र मारीयेवरील श्रद्धा, विश्वास, प्रेमाचा वटवृक्ष असाच वाढो – महागुरुस्वामी

हरेगाव अमृत महोत्सवी मतमाउली यात्रा शुभारंभ संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथील अमृत महोत्सवी यात्रेचा शुभारंभ बुधवारी उत्साहात नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाला. यात्रेपर्यंत दहा दिवस रोज सायंकाळी ५.३० वाजता नोव्हेनाप्रसंगी विविध धर्मगुरू पवित्र मारिया जीवनावर प्रवचन करतील.

यात्रा शुभारंभ प्रसंगी महागुरुस्वामी लुरडस डानियल यांनी प्रतिपादन केले की, आज आपण मतमाउलीच्या सन्मानार्थ येथे जमलो आहोत. ९ सप्टेंबर रोजी यात्रा असल्याने तिच्यावर श्रद्धा असल्याने लाखो भाविक येणार आहेत. इथे देवाची माता आहे. संपूर्ण मानवजातीची आई आहे. ती कृपेने परिपूर्ण आहे. प्रभूची दासी आहे. देवपुत्राला जन्म देणारी आई आहे.

येशू ख्रिस्त आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या शिष्याकडे पाहतो. काही पळाले जे होते त्यांना म्हणाले ही तुझी माता आहे. त्या दिवसांपासून आपले मारीयेचे नाते जोडले आहे. लग्न झाल्यावर पती पत्नी एकमेकांसाठी प्रेम करतात, त्याग करतात. आज आपण नोव्हेनावर प्रेम करतो. आपल्या जीवनाचे कोष्टक परिवर्तन करू या. तिने दिले ते दैविक आहे. तिच्या मध्यस्थीने मी देवाच्या चरणी जातो.

प्रभू येशू ख्रिस्त या जगात आले. त्यांनी आईची इच्छा काय आहे, देवाची इच्छा काय आहे, ती प्रथम पूर्ण करून त्यांनी पहिला चमत्कार काना येथे केला. लोकांनी आपला छळ केला, दु:खी आहोत तरी आई मदत करते म्हणूनच त्या आईवर संपूर्ण जगात विश्वास आहे. तिच्यावर श्रद्धा आहे. हरेगाव तीर्थस्थान पवित्र स्थान आहे. येथे येणाऱ्या भाविकांना दैविक अनुभव येतो. तुम्ही सुद्धा इथे राहता तुम्ही सुद्धा पवित्र आहात. म्हणून आपल्या विचाराने, शब्दाने, कृतीने, मनाने जवळ येतात.

तुम्ही सुद्धा प्रेमाचे, शांतीचे व क्षमेचे आचरण करून आदर्श घ्यावा तुमच्या अंतकरणात देव गेला आहे. त्यामुळे यशस्वी व्हाल. हा वटवृक्ष वाढणार आहे. त्याची आपल्याला फळे, फुले मिळणारच आहे. प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. स्वर्गीय मत तुम्हा बरोबर असो, तुमच्या कष्टात, गरिबीत, तुम्हाला साथ देवो.

यात्रा शुभारंभ प्रसंगी प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड, अंतोनी, मायकल वाघमारे, संजय पंडित, संजय पठारे, संजय जगताप आदी धर्मगुरू सहभागी होते. यावेळी चर्च धार्मिक प्रार्थना, पुस्तिकाचे प्रकाशन झाले. अमृत महोत्सव प्रतिकात्मक देखाव्याचे महागुरुस्वामी लुरडस डानियल यांच्या हस्ते शुभारंभ झाला. प्रारंभी मतमाउली मूर्ती, महागुरुस्वामी डानियल, फा. डॉमनिक यांची रथातून सवाद्य भव्य मिरवणूक हरेगावातून काढण्यात आली. जागोजागी पूजन करण्यात आले.

यावेळी महागुरुस्वामी यांचा राजेंद्र मगर, छबुराव रूपटक्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापुढे रोज सायंकाळी होणाऱ्या नोव्हेनाप्रसंगी सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारिओ व सहकारी धर्मगुरू, धर्मभगिनी यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button