धार्मिक

हरेगाव मतमाउली यात्रापूर्व शेवटचा नववा नोव्हेना संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव येथील अमृत महोत्सवी मतमाउली यात्रापूर्व नोव्हेनाचा शेवटचा नववा शनिवार भक्तिभावात संपन्न झाला. त्यावेळी फा. सहायराज यांचा पवित्र मिस्सा व फा. पॉली यांचे प्रवचन “पवित्र मारिया ईश्वरी कृपेची माता” या विषयावर प्रतिपादन केले की, माणसाने नेहमी आनंदी व समाधानी राहावे. सुखाची व्याख्या अजून कोणाला करता आली नाही. सुख हे घेण्यापेक्षा देण्यात जास्त असते. ते भोगण्यापेक्षा समजण्यात जास्त असते.

पवित्र मारिया ही ईश्वरी कृपेची माता असल्याने तिचा सर्वत्र गौरव होत असतो. तिचा आदर्श व तिचे गुण डोळ्यासमोर ठेवून आचरणात आणावे. या नोव्हेनाप्रसंगी फा. सहायराज, पॉली, प्रमोद बोधक, लोईड, हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक सचिन रिचर्ड आदी सहभागी होते. यावेळी प्रीती भोजन कोल्हार खुर्द येथील युवा नेते प्रदीप अशोक भोसले यांनी दिले. या भोजनाचा सुमारे शेकडो भाविकांनी लाभ घेतला.

आज ३० ऑगस्ट २०२३ रोजी महागुरु स्वामी लुरडस डानियल यांच्या उपस्थितीत यात्रा शुभारंभ ध्वजारोहणाने होणार आहे. त्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक, सचिन रिचर्ड व सर्व धर्मभगिनी, ग्रामस्थ हरेगाव उंदीरगाव यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button