धार्मिक

निष्कलंक माता पवित्र मारियाचा आदर्श घ्यावा – फा. नेव्हील

मतमाउली यात्रापूर्व आठवा नोव्हेना शनिवार भक्तिभावात संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव मतमाउली यात्रेचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यात्रेपूर्वी नोव्हेनाच्या आठव्या शनिवारी संत जोसेफ चर्च पानोडी येथील प्रमुख धर्मगुरू फा.नेव्हिल यांचे पवित्र मारिया जीवनावर प्रवचन व ज्ञानमाता विद्यालय प्राचार्य फा.जेम्स थोरात यांचा पवित्र मिस्सा संपन्न झाला.

त्यावेळी फा नेव्हील यांनी पवित्र मारिया निष्कलंक माता या विषयाचे पुष्प गुंफताना प्रतिपादन केले की पवित्र मरीयेचा आदर्श नेहमी आपल्या जीवनात समोर ठेवायला पाहिजे. उदाहरणार्थ एक बी खरेदी करण्यासाठी आपल्या मुलाबरोबर दुकानात गेली मला चॉकलेट पाहिजे तो मुलगा म्हणाला. दुकानदाराने त्याला विचारले तू काय करतोस?बरणी पुढे करून मुलाला चॉकलेट घ्यायला सांगतो. परंतु मुलगा लाजला. शेवटी दुकानदाराने आपला हात भरून मुलाची पिशवी भरली. घरी जाताना आईने मुलाला विचारले तू हात पुढे का केला नाहीस? मुलाने म्हटले त्याचा हात माझ्यापेक्षा मोठा आहे. मुलगा लहान होता परंतु त्याला फारच ज्ञान होते. तो स्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुकानदाराच्या दृष्टीने पाहत होता. मी स्वत: घेतले तर मी जास्त घेऊ शकत नाही. परंतु जर त्याने दिले तर मला जास्त मिळतील. परंतु त्याच्या आईने काय केले. आपल्या मुलाची इच्छा स्वत:च्या दृष्टीने पहात होती. त्याला कसे जास्त हुशार करण्याचे होते. शेवटी चालक कोण निघाला? आई किंवा मुलगा. नक्की तो मुलगा अतिशय हुशार निघाला.

आज अशी परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळते. लोकांना जे काय पाहिजे ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. चांगल्या वाईट मार्गाचा विचार करीत नाही. हे पाहिले तर यांच्यात फार अंतर मोठे आहे. आपल्याला वाटते फार अंतर नाही. हे आपल्याला पहिल्याच वाचनात दिसून येते. देवाने म्हटले सर्व झाडाची फळे खा. एक सोडून त्यांना समाधान वाटले नाही. ह्याला आपण मूळ पाप म्हणतो. म्हणजे समाधान नसणे. सैतानाला जाणीव झाली म्हणून तो काय करतो. त्या परिस्थितीचा फायदा घेतो. जेथे आपण दुर्बल आहोत. तेथे तो आपल्याला टोचतो. परिणाम हेवा फक्त पापात पडली नाही तर देवापासून ती दूर पळू लागली. पवित्र मरीयेचा संयमी जीवनाचा आदर्श घेऊ या. तिने दैवी मातृपणामध्ये भाग घेतला व आपणही देवपणामध्ये भाग घेऊ या.

आठव्या शनिवारी नोव्हेनात हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक, सचिन रिचर्ड, तसेच संत जोसेफ चर्च पानोडी येथील फा.नेव्हिल, सोवियो, थोमस, संत मेरी चर्च संगमनेर फा.सायमन शिणगारे,संत इग्नाथी चर्च घुलेवाडी फा.प्रशांत,नेल्सन परेरा,ज्ञानमाता विद्यालय संगमनेर फा,जेम्स थोरात,हॉली क्रॉस कन्व्हेट पानोडी सुपीरियर सि.शैला रोझारिओ,श सर्व सिस्टर्स,सहभागी झाल्या होत्या. येत्या नवव्या शनिवारी २६ ऑगस्ट रोजी “पवित्र मारिया ईश्वरी कृपेची माता” या विषयावर कोपरगाव कोळपेवाडी येथील चर्च धर्मगुरू प्रवचन करतील. तरी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ यांनी केले. या प्रसंगी वैभव पंडित सामाजिक कार्यकर्ते यांनी स्नेह भोजन दिले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button