श्रीरामपूरचे २०० भाविक घेणार तिरुपती बालाजीचे दर्शन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सन २००९ या वर्षापासून श्रीरामपूर तालुक्यातील गरीब कुटुंबातील शेतकरी, मजूर यांच्यासाठी “ना नफा ना तोटा” या धर्तीवर ३० ते ३५ सहली भारतात कन्याकुमारी ते वैष्णवदेवी, जगन्नाथपुरी ते रामेश्वर या पद्धतीने काढल्या आहेत, असे या सहलीचे सूत्रधार माजी चेअरमन सुरेश पा.गलांडे यांनी सांगितले.
या सहली अल्पदरात काढल्या आहेत. त्यात जेवण, नाष्टाची सुविधा आहे. परंतु यावेळी सहलीतील सहभागी भाविकांनी आम्ही बस, रेल्वे, जहाज, आदी वाहनाने फिरलो, पण यावेळी आम्हाला विमानाने प्रवास करावासा वाटतो, अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे यावेळी २०० भाविकांची तिरुपती तीर्थक्षेत्राची सहल विमानाने जाणार आहे. त्यासाठी अंदाजे १० ते ११ हजार रु प्रती व्यक्ती खर्च येणार आहे असे सुरेश गलांडे यांनी सांगितले.
दिव्य स्वप्न उरी बाळगले “गोरगरीबांना दर्शन घडविले” नित्य नव्हे आव्हान स्वीकारले “परिश्रमाचे चीज झाले” असे मनोगत एका जेष्ठ व्यक्तीने व्यक्त केले.
या सर्व यात्रेकरूंना उंदिरगाव येथील ग्रामस्थांनी, अशोक संचालक विरेश गलांडे, बाळासाहेब नाईक, रमेश गायके, सुदाम औताडे, सुरेश शिंदे, मार्केट कमिटी संचालक राजेंद्र पाउलबुद्धे, सुभाष बोधक, अशोक गलांडे आदींनी शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे अशोकनगर उद्योग समूह येथे सर्व बसेस आल्यावर त्यांना अशोक कारखाना चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर आदी मान्यवर व ग्रामस्थांनी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी चेअरमन भानुदास मुरकुटे यांचा करण ससाणे, सुरेश गलांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेथून सर्व बसेस पुणे येथे जाण्यासाठी रवाना झाल्या.