धार्मिक

परमेश्वराच्या तारणदायी कार्यात पवित्र मारीयेचे स्थान महत्वाचे-फा ब्रिस्टन

हरेगाव मतमाउली सहावा नोव्हेना शनिवार संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आजच्या प्रवचनात ‘परमेश्वराच्या तारणदायी कार्यात पवित्र मारिया’ या विषयावर प्रवचन करताना रे फा. ब्रिस्टन ब्रेटो यांनी सहाव्या शनिवारी नोव्हेना प्रसंगी पवित्र मारियाचा सणांन करीत आहोत. आपण ग्लोबल पोजीशनिग सिस्टीम याबद्दल ऐकलेच असेल. याचा अर्थ पृथ्वीवरील आपले स्थान. परमेश्वराचे तारणकार्य याविषयी सुद्धा आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.

आपल्या तारणाचा इतिहास म्हणजेच जर आपण उत्पत्तीत पाहिले तर आदाम व इव्हा यांची पहिली निर्मिती होती. तारणाची पहिली गरज पूर्ण सृष्टीला झाली. परमेश्वराने अधिपितर म्हणजेच अब्राहम याकोब, मोशे पाठविले, संदेश्टे पाठविले. जेणेकरून लोकांचे मनपरिवर्तन व्हावे व पुन्हा ते परमेश्वराकडे वळावे यासाठी संदेश्टे पाठविले. परमेश्वराने या तारण योजनेला आपला पुत्र पाठविला. जेंव्हा संत अन्नाच्या उदरात जेंव्हा पवित्र मारिया गर्भवती राहिली. तेंव्हाच झाली.

पवित्र मारीयेचा जन्म झाल्यावर तीन वर्षाची असताना तिला मंदिरात सेवा करण्यासाठी ठेवण्यात आले. जेणेकरून तिला मोशेचा नियम योग्य प्रकारे समजावा, गाब्रीयाल देवदुताने पवित्र मरीयेला दर्शन दिले व देवाच्या आई होण्याचे निमंत्रण दिले. एकनिष्ठ दाखवून मी प्रभूची दासी आहे असे उद्गार काढले. प्रभू येशूला जन्म दिला तेंव्हा तो राजवाड्यात नव्हता तर गाईच्या गोठ्यात होता.

येशूच्या मरणानंतर सुद्धा ती प्रार्थना करीत राहिली. तिच्यावर सुद्धा पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. पवित्र मरिया स्वर्गात गेली हे बायबलमध्ये नाही. म्हणूनच आपण परंपरावर विश्वास ठेवतो. ते आहे धर्मसत्य, पवित्र मारियेला सहउद्धारिणी या नावाने ओळखले जाते. कारण जरी येशू ख्रिस्त हा एकुलता एक उद्धारक असेल तरी सुद्धा पवित्र मरिया ही त्याचेबरोबर लोकांना उद्धारक आहे. ती सध्या आपली काळजी घेत आहे. ती सहमध्यस्थी असल्याने लोकांना परमेश्वराकडे येशू ख्रिस्ताकडे आणण्याच्या प्रयत्न करते. तिच्याकडे प्रार्थना करू या कारण आतासुद्धा स्वर्गातून परमेश्वराबरोबर सहकार्य करीत सर्वत्र दर्शने देते. व येशूकडे आणण्याचा प्रयत्न करते. पवित्र मरीयेप्रमाणे पवित्र मरीयेने तिच्या जीवनात परमेश्वरची आज्ञा प्रमाण मानली तशी आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये आपल्याला दिलेली आहेत ती पार पाडू या.

या नोव्हेना प्रसंगी दोन बॉस्को चर्च, संत जॉन चर्च, संत अन्न चर्च अहमदनगर येथील धर्मगुरु फा.ब्रीस्टन, विश्वास, रिचर्ड, अजय, हरेगाव प्रमुख धर्मगुरु फा डॉमनिक, रिचर्ड, सचिन तसेच नगर, हरेगाव येथील धर्मभगिनी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.१२ ऑगस्ट रोजी घोडेगाव, व सोनगाव येथील धर्मगुरू प्रवचन करणार आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button