धार्मिक

परमेश्वराने पवित्र मरीयेला तारणाऱ्याची माता म्हणून सन्मानित केले- फा. जाधव

हरेगाव मतमाउली यात्रापूर्व चौथा शनिवार नोव्हेना संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : देवाच्या योजनेतील पवित्र मारिया या विषयावर आज हरेगाव मतमाउली यात्रापूर्व चौथ्या शनिवारी नोव्हेनाप्रसंगी प्रमुख याजक फा. आंड्र्यू जाधव यांनी प्रतिपादन केले की, जगाच्या उत्पत्तीपूर्वीच परमेश्वराने मानवाच्या तारणाची योजना आखली होती आणि ही तारणाची योजना या जगात लागू करण्यासाठी त्याने पवित्र मरीयेची निवड केली.

तारणा-याची माता म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळपास ७०० ते ८०० अगोदर परमेश्वराने येषां संदेष्ट्याव्दारे भविष्यवाणी केली होती. भविष्यवाणी अशी होती यास्तव प्रभू येशू तुम्हास एक चिन्ह देत आहे. कुमारिका गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि ती त्याचे नाव इ मन्युएल असे ठेवील. या शब्दाचा अर्थ आहे. आम्हा बरोबर देव म्हणून परमेश्वराने पवित्र मरीयेची तिच्या पुत्राची माता होण्यासाठी निवड केली. तिच्याव्दारे परमेश्वर मानवरूप धारण करून या जगामध्ये आला व खऱ्या अर्थाने मानवाच्या तारणाला सुरुवात झाली.

परमेश्वराने पवित्र मरीयेला तारणाऱ्याची माता म्हणून सन्मानित केले. परंतु परमेश्वर एव्हड्यावर थांबला नाही तर परमेश्वराने आणखी एक मानाचा तुरा तिच्या जीवनामध्ये रोवला व तो मानाचा तुरा म्हणजे परमेश्वर, ईश्वराने तिला संपूर्ण जगाची पूर्ण विश्वाची व संपूर्ण मानव जातीची एक प्रेमळ माता घोषित केली. आज ती आपल्या सर्वांची अध्यात्मिक माता आहे व ही अध्यात्मिक माता आपल्यासाठी नेहमी तिच्या पुत्राजवळ मध्यस्थी करीत असते. जगाच्या कल्याणासाठी आपल्या सुखासाठी व आपल्या अध्यात्मिक जीवनामध्ये प्रगतीवाढ होण्यासाठी ती सतत राहते.

नोव्हेना प्रसंगी टिळकनगर येथील प्रमुख धर्मगुरू फा. मायकल वाघमारे, संजय पठारे व श्रीरामपूर धर्मग्रामातील प्रमुख धर्मगुरू फा. ज्यो गायकवाड, राजू शेळके, संपत भोसले, हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा डॉमनिक, सचिन, रिचर्ड आदी धर्मगुरू सहभागी झाले होते. प्रारंभी श्रीरामपूर, टिळकनगर व परिसरातील भाविकांची भव्य मिरवणूक संत तेरजा चर्च प्रांगणात काढण्यात आली होती. त्यात सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी सहभागी झाले होते.

येत्या पाचव्या शनिवारी २९ जुलै रोजी येशू सदन, फातिमा माता चर्च राहुरी कारखाना येथील धर्मगुरु ‘आरोग्य दायिनी पवित्र मरिया’ या विषयावर प्रवचन करतील. तरी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन हरेगाव प्रमुख धर्मगुरु फा. डॉमनिक, सचिन, रिचर्ड व सर्व धर्मभगिनी व हरेगाव, उंदीरगाव ग्रामस्थ यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button