महाराष्ट्र

बदनामी चे षडयंत्र फसले, शेतकरी निघाले ईस्त्राईलला

अहमदनगर | राहुल कोळसे : उद्योगभारती ही संस्था राज्यातील शेतकरी बांधवांना ईस्त्राईलला अभ्यास दौरा आयोजन करणारी संस्था म्हणून नावारुपाला आली. कोरोना काळात या संस्थेच्या वतीने करण्यात येणार्या दौऱ्यांवर परिणाम झाला. मात्र कोरोनानंतर पुन्हा ईस्त्राईल करता शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळू लागला. तरीही परदेश प्रवास म्हटलं की आणि ईस्त्राईल सारखा देश म्हटलं की तांत्रिक अडचणी या असणारच… २०२२ मध्ये पन्नास शेतकर्यांना ईस्त्राईल ने अचानक व्हिसा नाकारला आणि उद्योग भारतीचा हा दौरा व्यावसायिक विरोधकांकडून संशयाच्या भोवर्‍यात अडकला. ज्यांच्यामुळे व्हिसा रद्द करण्यात आला त्याच बहाद्दरांनी उद्योगभारतीची जाहीर आणि येथेच्छ बदनामी करण्यास सुरुवात केली. काहींनी ईस्त्राईल कृषि अभ्यास दौरा समन्वयक म्हणून प्रसिद्ध आणि अनुभवी असलेल्या महेश कडूस पाटील यांची सोशल मीडिया वरून बदनामीचा पेड विडाच उचलला.

आता या रद्द झालेल्या ग्रुप मधील काही जणांना एक वर्षानंतर व्हिसा मिळाला असून लवकरच ते ईस्त्राईल प्रवास पुर्ण करतील अशी माहिती उद्योगभारती बाणेर पुणे कार्यालयातून दिली गेली आहे. व्हिसा मिळण्यात पुर्वी अडचणी येत नव्हत्या, परंतु काही मंडळींनी जाणीवपूर्वक ग्रुप मध्ये प्रवेश करून आम्हाला अडचणीत आणण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांचे व्हिसा २०२२ मध्ये रद्द करण्यात आले होते त्यातील काही शेतकऱ्यांना २०२३ मध्ये व्हिसा मुंबई येथून आम्ही प्रयत्न पुर्वक मिळवून दिला आहे. अजुन काही शेतकरी प्रतिक्षेत असले तरी व्हिसा मिळवून प्रवास करण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांचा व्हिसा मुंबईतून आम्ही केला आहे त्यांचे ईस्त्राईल प्रवासाचे स्वप्न आता जुलै २०२३ ला पुर्ण होईल. तसेच व्हिसा होणे न होणे हे आमच्या हातात नसले तरी आम्ही आमच्या शेतकरी सभासदांना व्हिसा मिळवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करतोय. ते दौर्यात आले तर आमचाही फायदाच होतो. त्यामुळे अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊ नये असे प्रतिपादन ईस्त्राईल दौरा समन्वयक महेश कडूस पाटील यांनी केले आहे.

जुलै २०२३ अखेर सुमारे तीस शेतकरी ईस्त्राईल करता निघणार असून, व्यावसायिक बदनामी नंतर उद्योगभारती ने हे मिळवलेले मोठे यश असून, महेश कडूस पाटील हे ईस्त्राईल कृषि अभ्यास दौरा विषयावरील अनुभवी व तज्ञ असून त्यांनी आणि संस्थेने बदनामी करणार्यांची तोंडे आपल्या कामातून बंद केली आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी दिल्या आहेत. बदनामी केलेल्या पेड विरोधकांवर पुणे पिंपरी चिंचवड येथे ३ कोटीचा नुकसान भरपाईचा व अब्रू नुकसानी व आर्थिक नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. एकूणच उद्योगभारती आणि ईस्त्राईलचे काम कृषि क्षेत्रात नव्या जोमाने पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button