अहमदनगर

कोल्हार-उदरमल घाटातील खड्डेमय रस्त्यामुळे घाट बनला धोकादायक – शिवाजीराजे पालवे

11 जुलैला जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा

नगर – कोल्हार-उदरमल घाटातील खड्डेमय रस्त्यामुळे होणारे लहान-मोठे अपघात तर अपघातामुळे अनेकांचे जीव जात असताना घाटातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. मागील वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करुन देखील दखल घेतली जात नसल्याने संघटनेच्या पुढाकाराने कोल्हार, उदरमल, चिचोंडी शिराळ, डोंगरवाडी, धारवाडी, गितेवाडी, डमाळवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कोल्हार घाटात रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती जय हिंदचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार व नगर तालुक्यातील उदरमल या ठिकाणी असलेला कोल्हार-उदरमल घाटातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर खड्डयांची चाळण झाली असून, खड्डेमय रस्ता अनेक अपघातांना कारणीभूत ठरत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एक वर्षापासून पाठपुरावा करुन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाक केली आहे. या घाटातून सर्वसामान्य शेतकरी, नोकरदार वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात रहदारी करतात. अनेक लहान मोठ्या गावांना जोडणारा हा घाट आहे. अनेक ठिकाणी रोड खचलेला असून, पावसाने साईड पट्टया वाहून गेल्या आहेत.

नुकतेच पाऊसाचे आगमन झाले असून, खराब रस्त्यामुळे हा घाट बंद पडण्याची चिन्हे आहेत. यामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात मान्सून सक्रीय होण्यापूर्वी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. रस्ता दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास 11 जुलै रोजी जय हिंद फाऊंडेशनच्या पुढाकाराने कोल्हार, उदरमल, चिचोंडी शिराळ, डोंगरवाडी, धारवाडी, गितेवाडी, डमाळवाडी येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत कोल्हार घाटात रास्ता रोको केला जाणार असल्याची माहिती जय हिंदचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.

या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य एकनाथराव आटकर, पाथर्डी बाजार समितीचे संचालक वैभव खलाटे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अंबादास डमाळे, बाळासाहेब पालवे, कोल्हारचे सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, महादेव पालवे गुरुजी, सोपानराव पालवे, शंकरराव डमाळे, नामदेव जावळे, जांबुवंत पालवे, अशोक गर्जे, ग्रामपंचायत सदस्य किशोर पालवे, ईश्‍वर पालवे, शर्मा पालवे, संदीप पालवे, गौरव गर्जे, सोपान पालवे, प्रेमकुमार पालवे, बाबाजी पालवे, मदनशेठ पालवे, विजय पालवे, जय हिंदचे शिवाजी गर्जे, अ‍ॅड. पोपट पालवे, अ‍ॅड. संदीप जावळे, रोहीदास पालवे, उदरमलचे सरपंच केशव भिंगारदिवे, वैभव पालवे, अशोक आव्हाड, नवनाथ पालवे, सचिन पालवे, बंडू पालवे, चेअरमन बाबाजी आव्हाड, शिराळचे सरपंच रविंद्र मुळे, अमोल घोरपडे, उपसरपंच उमाताई आव्हाड, मिठ्ठू मुळे, अवधूत दारकुंडे, अमोल वाघ, गितेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पोटे, उपसरपंच राजेंद्र गिते, महादेव गिते, रामेश्‍वर गिते, वैभव गिते, डोंगरवाडीचे सरपंच उद्धव गिते, दिलीप गिते, विठ्ठल नाना गिते, माणिकराव गिते, डमाळवाडी सरपंच रामनाथ शिरसाठ, आंबादास शिरसाठ, महादेव शिरसाठ, करण डमाळे, आनंदराव शिरसाठ, उपसरपंच दगडू डमाळे, भानुदास डमाळे, चिचोंडीचे सरपंच कलाबाई आटकर, श्रीकांत आटकर, प्रमोद जराड, आबा गरुड, बबनराव गायकवाड, संजय शिंदे, चेअरमन पोपट आव्हाड, आश्रुबा आव्हाड, विष्णु गंडाळ, संदीप दानवे, युवा नेते संतोष गरुड, धारवाडीचे सरपंच बापू गोरे, उपसरपंच चंद्रकांत बडे, भिमराज सोनवणे, नवनाथ रणसिंग, चरणदास आव्हाड, भाऊसाहेब गोरे, कैलास गिते, रमेश गिते यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button