अहमदनगर

वरिष्ठ लिपिक गवारे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात साजरा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, शिरसगाव शाळेत वरिष्ठ लिपिक शशिकांत गवारे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांनी खासदार गोविंदराव ग्रामीण शिक्षण संस्था संचलित विविध शाखेमध्ये जवळपास 33 वर्षे सेवा केली. त्यानिमित्ताने त्यांचा सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य मच्छिंद्र जगताप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.दांगट व पंडित यांनी केले. प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या सुमती औताडे यांनी केले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. गवारे यांच्या मुलीने व मुलाने आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या. ग्रामस्थांमधून किशोर पाटील बकाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना स्नेहभोजन देण्यात आले.

त्यांनी विद्यालयाच्या रंग कामासाठी विद्यालयाच्या प्राचार्या औताडे यांच्याकडे 31000 रुपयांची देणगी दिली. तसेच विद्यालयामध्ये महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त पंचायत समिती कृषी विभाग व श्रीरामपूर फर्टीलायझर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण करण्यात आले. विद्यालयातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातील ग्रामस्थ व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

यावेळी बापूसाहेब काळे, कडू पवार, माधव पवार, रामचंद्र बकाल, गं.भा.रतनबाई गंगाधर पाटील बकाल, सौ खाजेकर, व्ही आय थोरात, शिरसगाव सोसायटी चेअरमन किशोर गंगाधर पाटील, राजाराम गवारे, राजेंद्र आहेर, ॲड.कैलास गवारे, गणेशराव मुदगुले, साईनाथ गवारे, भास्करराव ताके, संजय चांगदेव गवारे, कचरू पा बढे, सीताराम धनाड, शिवाजी गवारे, निवृत्ती गवारे, अशोकराव गवारे, संजय रामदास गवारे, नितीन सोपानराव गवारे, नवनाथ ताके, दिनकरराव यादव, भगवान गवारे, चेतन औताडे, कृषी अधिकारी उस्मान शेख, राहुल उंडे, कोलते, डावखर प्रसाद, अशोकराव लहरे, बाळासाहेब म्हसे, सुरेश म्हसे, बाळासाहेब लबडे, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत वाकचौरे, प्रकाश गाढे, रावसाहेब गाढे, प्रकाश हरिशचन्द्रे, गोरक्षनाथ लबडे आदीस्नेही नातेवाईक उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button