धार्मिक

हरेगाव चर्च प्रमुख धर्मगुरूपदी डॉमनिक रोझारिओ यांची नियुक्ती

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान हरेगाव येथे प्रमुख धर्मगुरू स्व.फा.सुरेश साठे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या प्रमुख धर्मगुरूपदी सध्या प्रभारी असलेले व प्रजा जागृती शिक्षण संस्था अहमदनगर सचिव व धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ यांची महागुरुस्वामी लूरडस डानियल यांनी संत तेरेजा चर्च प्रमुख धर्मगुरूपदी नियुक्ती केली आहे.

फा. रोझारिओ यांची ६ फेब्रुवारी १९९४ या वर्षी राजोडी ( वसई ) या गावी गुरुदीक्षा झाली. धर्मगुरू पदी २९ वर्षापासून कार्यरत आहेत. १९९९ ते २००४ पर्यंत राहता येथे प्रमुख धर्मगुरू, २००४ ते २०१२ पर्यंत केंदळ सेंट जोसेफ हायस्कूल प्राचार्य, २०१२ ते २०१५ सेंट जॉन इंग्लिश मिडियम स्कूल राहता प्रिन्सिपाल, जून २०१५ ते मे २०१७ केंदळ व २०१७ ते आजपर्यंत हरेगाव येथे धर्मगुरू आहेत.

२०२० पासून प्रजा जागृती शिक्षण संस्था अहमदनगर सचिवपदी कार्यरत आहेत. मतमाउली यात्रेचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने व त्यांची नियुक्ती झाल्याने सर्वांना आनंद झाला व त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button