कृषी

खरीप हंगामाच्या विभागीय बैठकीचे आयोजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कामधेनु सभागृह, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे दि. 20 जून, 2023 रोजी विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती खरीप-2023 च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील असणार आहेे. प्रमुख पाहुणे म्हणून कृषि आयुक्त सुनिल चव्हाण, प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिलीप झेंडे उपस्थित असणार आहेत. ही बैठक संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

या बैठकीमध्ये गतवर्षाचा पीक उत्पादनाचा आढावा आणि खरीप 2023 चे नियोजन बाबत सखोल चर्चा होणार आहे. खरीप हंगामासाठी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान आणि शिफारशींचे सादरीकरण होऊन कृषि विभागास हे तंत्रज्ञान आणि शिफारशी पुढील विस्तारासाठी देण्यात येणार आहेत. सदर बैठकीत खरीप हंगामातील विविध पिकांचे नियोजनासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या बैठकीला कृषि विभागाचे सर्व संचालक, कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button