अहमदनगर

प्रस्थापितांची घराणेशाही मोडीत काढण्यासाठी स्वराज्याचा झेंडा हातात घ्या – गायकर

स्वराज्य पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष कानवडे यांची निवड

संगमनेर शहर : प्रस्थापित राजकारण्यांची घराणेशाही मोडीत काढण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाचा झेंडा हाती घ्या, असे आवाहन महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांनी केले आहे.

संगमनेर येथील पाहुणचार लॉन्स या ठिकाणी स्वराज्य पक्षाचा जिल्हा मेळावा व जिल्ह्याची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात गायकर व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे, राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, किरण डोके, पुष्पाताई जगताप, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख मनोरमाताई पाटील, कामगार आघाडी जिल्हाप्रमुख दिनेश नरवडे, रेखाताई पाटील, रेखाताई जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना करण गायकर म्हणाले की, आता स्वराज्य पक्ष राजकारणात आला असल्याने आतापर्यंत तुमची जी राजकीय मक्तेदारी होती ती मोडीत काढायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. सामाजिक चळवळ करत असताना आमचे पदाधिकारी तुम्ही केलेल्या चुकीच्या कामांची पाहणी करून प्रशासनास व सर्वसामान्य जनतेला जागे करत असताना तुमचे काही राजकीय दलाल ठेकेदारी करून चुकीची काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच या कामांच्या बाबत स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर त्यांना दम देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करून हे काम पूर्ण करण्याचे धाडस तुम्ही दाखवत आहे.

परंतु तुम्ही हे विसरला आहात आम्ही पण छत्रपतींचे शिलेदार आहोत, यापुढे असे गैर कृत्य जर केले तर तुम्हाला तुमची जागा दाखवून द्यायला आम्हाला वेळ लागणार नाही. यापुढे आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्या नादाला लागू नका चांगले काम करा, निश्चितच तुमच्या कामाचा गुणगौरव करू. परंतु चुकीचे काम खपवून घेतले जाणार नाहीत. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे व इतर सर्व पदाधिकारी तुम्ही जनतेचे काम करत असताना कुणालाही घाबरण्याची गरज नाही.

या राज्यात लोकशाही आहे. लोकशाही मार्गाने आपण आंदोलन, मोर्चा काढून चुकीच्या कामांना आळा घालू शकता. तुम्ही लढा उभा करा तुमच्या पाठीशी छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्य पक्ष आहे.ही दहशत आपण मोडकळीस आणू.गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्याचा मावळा या संकल्प द्वारे तुम्ही सर्वांनी स्वराज्य घरा घरात पोहोचविण्याचे काम करा त्या माध्यमातून येणाऱ्या सर्व निवडणूका जिथे जिथे शक्य आहे तिथे उमेदवार उभे करून स्वराज्यचा झेंडा नगर जिल्ह्यात फडकवा असेही आव्हान त्यांनी उपस्थितीत कार्यकर्त्याना केले.

स्वराज्य पक्षाची घौडदौड महाराष्ट्रभर चालू आहे. स्वराज्य संकल्प अभियान सर्वत्र राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून दि १४ जून रोजी संगमनेर येथे नगर जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनियुक्त जिल्हा प्रमुख इंजि. आशिष कानवडे यांनी करत संघटनेचे पंचसूत्र सांगत स्वराज्य पक्ष काय करू शकतो हे सांगितले. यानंतर उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे, राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहूळे यांनी स्वराज्य पक्ष बांधणीच्या संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी स्वराज्य पक्षाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणी मध्ये उत्तर विभाग जिल्हा प्रमुखपदी आशिष कानवडे, शेतकरी आघाडी उत्तर महाराष्ट्र संघटक संजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी संपर्कप्रमुख डॉ.शांताराम गायकवाड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ पूजा राखपसरे, जिल्हा उपाध्यक्ष वैशाली खरात, जिल्हा संघटक उत्तर विभाग राजेश शिंदे, जिल्हाप्रमुख विद्यार्थी आघाडी गोकुळ आंधळे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप औटी, उपजिल्हाप्रमुख स्वप्नील भोसले, संगमनेर तालुकाध्यक्ष संदिप राऊत, उपाध्यक्ष संतोष खरात, कार्याध्यक्ष राहुल कानवडे, युवक तालुकाध्यक्ष सागर नेहे, युवक उपाध्यक्ष विशाल कदम, संगमनेर शहराध्यक्ष निलेश पवार, शहर उपाध्यक्ष विनोद कोकणे, युवक शहराध्यक्ष भीमराज पवार, संगमनेर खु गट प्रमुख सचिन कानवडे, वडगाव-तळेगाव गट प्रमुख योगेश जोर्वेकर, निमोण गट प्रमुख विठ्ठल दिघे, कोपरगाव तालुका अध्यक्षपदी विठ्ठल भुजाडे, उपाध्यक्ष राजेंद्र कुर्हे, वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष दिनेश जऱ्हाड, युवक तालुकाध्यक्ष नेताजी अजगे, शिर्डी शहर विद्यार्थी अध्यक्ष यश केदारे, शिर्डी शहर उपाध्यक्ष सार्थक डांगे, तालुका संघटक शुभम पिलाई, शेतकरी आघाडी उपाध्यक्ष अंकुश मोरे, पारनेर तालुका अध्यक्षपदी उद्यराज कुंडे, तालुकाउपाध्यक्ष गारुडकर, युवक तालुकाध्यक्ष गवराम गायकवाड, संपर्क प्रमुख संकेत शिरोळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी हाऊसाबाई आढाव, अकोले तालुका अध्यक्षपदी दत्तू लहामगे, युवक तालुकाध्यक्ष अनिल देठे, तालुकाध्यक्ष महिला आघाडी सौ सिंधुताई पथवे आदी पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आल्या. यावेळी सूत्रसंचालन राज्य निमंत्रक किरण डोके यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष संदीप राऊत यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button