अहमदनगर

कुलगुरूंनी जाणून घेतल्या महिला कर्मचार्यांच्या समस्या

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयातील महिला अधिकारी व कर्मचार्यांच्या बर्याच दिवसांपासूनच्या मागण्या आज कुलगुरू डॉ. पी. जी.पाटील यांनी मार्गी लावल्या.

यामध्ये पदव्युत्तर महाविद्यालयाची गेल्या चार वर्षांपासून कोव्हिड काळातील बंद असलेली जुनी पार्किंग शेड सुरू करणे, पार्किंगजवळील रस्त्याचे काम करणे, पदव्युत्तर महाविद्यालयातील महिलांच्या स्वच्छता गृहांच्या नूतनीकरणाबरोबरच साफसफाईची कामे दररोज व्हावीत अशा मागण्यांचा समावेश होता. डॉ. रितू ठाकरे, डॉ. संगीता भोईटे, सौ. शीतल जगदाळे यांनी यावेळी महिला कर्मचार्यांच्या समस्या मांडल्या.

याप्रसंगी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी उपस्थित महिला वर्गाला आपल्या मागण्या वेळेवर पूर्ण केल्या जातील तसेच अजूनही काही समस्या असतील तर त्याचेही निराकरण विनाविलंब केले जाईल असे म्हणून आश्वस्थ केले. यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते जुन्या पार्किंग शेडचे उद्घाटन करून तेथील पार्किंग व रस्ता सुरू करण्यात आला.

याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, कुलगुरूंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नवले, उद्यानविद्या विभागाचे डॉ. भगवान ढाकरे, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे, सहाय्यक कुलसचिव आर.डी. पाटील व पदव्युत्तर महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button