सामाजिक

माणुसकीला वृद्धिंगत करण्यासाठी माणुसकीची शाळा – साळवे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : कोरोना कालावधी पासून माणुसकी लोप पावत चालली आहे. सध्याची परिस्थिती देखील माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशाही परिस्थितीत मुलांमधील माणुसकी वृद्धिंगत करण्यासाठी “माणुसकीची शाळा” हा उपक्रम नक्कीच नितीमुल्ये जोपासण्यासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी केले.

अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व मिशन माणुसकी यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्षा हाॅल बोंबले पाटील नगर याठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माणसात माणूसपण पेरणारी माणुसकीची शाळा एकदिवसीय प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड होत्या. कार्यक्रमासाठी मिशन माणुसकीचे संचालक शिवाजी नाईकवाडी, सामाजिक एकता विचारमंचचे सुधाकर बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस संजय साळवे व वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अहमदनगर येथील माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी, ओम शिंदे, युवराज पाटील, आर्या मिसाळ, नुपुर घटे, शौर्या न्यायपलली, अनुष्का पाटील यांनी विविध खेळांच्या व चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना नितीमुल्ये शिकवली. दुपारच्या सत्रात संभाजी पवार राहुरी, श्रीमती सोनम धिवर, राजेंद्र हिवाळे यांनी मनोरंजनात्मक खेळांच्या माध्यमातून माणुसकी धर्माची शिकवण दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमोल सोनवणे यांनी केले तर आभार राहुल साळवे यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button