पेन्शन वाढीचा लढा अंतिम टप्प्यात – पोखरकर
पाथर्डी : तालुक्यातील राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ईपीएस 95 पेन्शनरांचा मेळावा श्री. गणेश मंदिर, पाथर्डी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सभेत श्रीगोंदा शहराध्यक्ष डाॅ.गाडेकर, लोणी सचिव जी.के. चिंतामणी, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा श्रीमती आशाताई शिंदे, जिल्हाध्यक्ष एस.के.समिंदर यांनी आपले विचार व्यक्त केले. संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
पोखरकर यांनी मा.सुप्रीम कोर्ट निर्णय व ईपीएफ ओ ची परिपत्रके याबाबत विचार व्यक्त करुन हे निव्वळ मृगजळ असुन त्याचा फारसा फायदा होणार नाही. आपण सर्व जण कमांडर अशोकराव राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभर गेली ६ ते ७ वर्षे केंद्र सरकार सोबत वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून जो लढा देत आहोत तोच आपल्या फायद्यासाठी योग्य आहे. लढा आता अंतिम टप्प्यात आहे व चांगला निर्णय येणार आहे.
पण लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी यापुढे ही सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. दि. १५ मार्चला रास्तारोको व नंतर निषेध मोर्चा आणि खासदारांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन यात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देवून गरज पडल्यास पूढील आंदोलनात दुप्पट संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी पाथर्डी तालुका सचिव साहेबराव वाघ यांनी सर्व पदाधिकारी यांचा सत्कार व सर्व उपस्थितांची सहभोजनाची स्वतः छान व्यवस्था केली होती. सर्वांनी त्याबद्दल वाघ यांचे आभार मानले. या सभेस मोठ्या संख्येने पेन्शनर बंधू भगिनींची उपस्थिती होती.