साहित्य व संस्कृती

महाराष्ट्रदिनी भूमी फाउंडेशनचे मराठी साहित्य संमेलन स्तुत्य उपक्रम – कामगार सहआयुक्त गीते

पुणे – महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेने ऑनलाइन राज्यस्तरीय मराठी साहित्य व कवी संमेलनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांनी केले.

या संमेलनामध्ये महाराष्ट्रातून तसेच परराज्यातील आणि परराष्ट्रातील खूप लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या संमेलनाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. संमेलनाचे उद्घाटन पुणे येथील कामगार सह आयुक्त डॉ.अभय गीते यांनी केले तर भूमी फाउंडेशन मराठी साहित्य व कवी संमेलनाच्या तिसऱ्या अध्यक्षा म्हणून प्रा.डॉ.स्नेहल तावरे माजी अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी भुषवले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य टी इ शेळके, प्रा.डॉ.बी.एस.मुरादे, प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये, प्राचार्या डॉ.मनीषा शेवाळे इत्यादी होते.

यावेळी उद्घाटन प्रसंगी कामगार सहआयुक्त अभय गीते यांनी सांगितले की, भूमी फाऊंडेशन करत असलेले कार्य हे निश्चितच गौरवास्पद असून कैलास पवार सारख्या तरुणाला सर्व स्तरावरून सहकार्य होणे गरजेचे आहे. आज पाठीमागे वळून बघताना भूमी फाउंडेशनच्या कार्याचा आलेख शब्दात मोजता येण्याजोगा नाही. एवढे अफाट कार्य भूमी फाउंडेशनने केले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

त्याचबरोबर कवी संमेलनाच्या तिसऱ्या अध्यक्षा डॉ. स्नेहल तावरे यांनी सांगितले की, कैलास पवार यांनी मोठ्या तळमळीने भूमी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील असंख्य ज्वलंत विषय घेऊन आज त्यांनी समाजासाठी काम केले आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. इतक्या कमी वयामध्ये त्यांचा सामाजिक कार्याचा आलेख न मोजता येणारा आहे. या वयात फारसे तरुण या क्षेत्रात दिसत नाही. परंतु कैलास पवार यांच्या सामाजिक कार्याला देश पातळीवरती पुढे आणण्याची गरज आहे, असे मत डॉ. तावरे यांनी व्यक्त केले. प्राचार्य शेळके, प्रा.डॉ.बी.एस.मुरादे यांनी कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.

प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी भूमी फाउंडेशन वरती कविता सादर करून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कवी संमेलन हे प्रा.संगीता फासाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. विविध स्तरावरून सहभागी झालेल्या असंख्य कवींनी यावेळी आपल्या कविता सादर केल्या. मान्यवरांचे स्वागत हे भिमराज बागुल यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार बी आर चेडे यांनी केले. यावेळी अनिताताई पवार, प्रज्ञाताई धुमाळ त्याच बरोबर इतर स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या राज्यस्तरीय मराठी साहित्य व कवी संमेलनाचा निकाल लवकरच निवड समितीद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. विजेत्या सर्व स्पर्धकांना येणाऱ्या आगामी कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमाशी बोलताना संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांनी दिली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button