अहमदनगर

लोकसहभागातून विविध रस्ते मोकळे करण्यासाठीची विशेष मोहिम प्रभावीपणे राबवा- जिल्हाधिकारी सालीमठ

3 एप्रिल ते 30 जुन दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन

नगर – शेतक-यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी व शेतातील माल वाहतुक करण्यासाठी अतिक्रमण मुक्त रस्ते अत्यावश्यक आहेत. त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद रस्ते, शेत रस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग व शिवरस्ते लोकसहभागाव्दारे मोकळे करुन देण्यासाठी राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून

3 एप्रिल ते 30 जुन, 2023 या कालावधीत जिल्ह्यात आयोजित विशेष मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले असुन अशा रस्त्यांची मोजणी करुन गाव नकाशावर व अधिकार अभिलेखात रस्त्यांची नोंद करण्याच्या सुचनाही एका परिपत्रकाद्वारे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कुटूंबाचे विभाजन होत असल्यामुळे शेतीचे देखील विभाजन होत आहे. त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी कमी होत असुन शेतकऱ्यांचा कल त्यांच्या शेतातुन सुरु असलेली वहिवाट बंद करण्याकडे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वहिवाट रस्ते, ग्रामीण रस्ते, हदीचे ग्रामीण रस्ते खुले करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कालबद्धरित्या मोहिमेच्या आखणीनुसार रस्ते खुले करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button