अहमदनगर

मतमाउली भक्तिस्थान कमान आश्वासनाप्रमाणे पूर्तता

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथे मतमाउली भक्तीस्थानाकडे जाणार्या रस्त्यावर धार्मिक कमान मिळावी या मागणीचे निवेदन लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान धर्मगुरू डॉमनिक व चर्च सभासद यांनी दिले असता त्या मागणीला तत्काळ मंजुरी दिली होती.
माजी आमदार मुरकुटे यांच्या आश्वासनाप्रमाणे गुरुवारी उंदीरगाव रस्त्यावर भक्तीस्थानाकडे दर्शक कमान अशोक स.कारखाना यांच्या सौजन्याने उभारण्यात आली. त्यावेळी धर्मगुरू डॉमनिक, अपंग सामाजिक संघटना चेअरमन संजय साळवे, विलास साळवे, भीमराज बागुल, सुभाष पंडित, अशोक कारखाना संचालक विरेश गलांडे व ग्रामस्थ उपस्थित होते. कमान उभारल्यामुळे सर्वांनी मा.आ.भानुदास मुरकुटे यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Back to top button