कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठात एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पाच्या द्विवार्षिक कार्यशाळेचे आयोजन

राहुरी विद्यापीठ : भारतीय एकात्मिक शेती संस्था, मोदीपुरम व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प यांचे संयुक्त विद्यमाने एकात्मिक शेती या विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दि. 18 ते 21 जानेवारी, 2023 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
या द्विवार्षिक कार्यशाळेसाठी भारतातील 25 राज्य/केंद्रशासीत प्रदेशातून 160 शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पाचे भारतामध्ये 25 मुख्य केंद्र, 11 उपकेंद्र तसेच शेतकर्यांच्या शेतावरील योजना यांची 32 केंद्रे आहेत. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तसेच शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करणे अतिशय महत्वाचे आहे. अखिल भारतीय स्तरावर 25 राज्यांसाठी बागायत/जिरायतीसाठी सिमांत व लहान शेतकर्यांसाठी हवामाननिहाय प्रारुपे विकसीत केलेली आहे. तसेच या कार्यशाळेमध्ये विविध पीक पध्दती, सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती या विषयावर बुध्दीमंथन करण्यात येणार आहे. याचप्रमाणे नाबार्डद्वारे एकात्मिक शेती प्रारुपे शेतकरी गटांमार्फत कमी व्याजाद्वारे कशा प्रकारे या प्रारुपांचा प्रचार व प्रसार करण्यात यावा यावर चर्चा आयोजीत केली आहे.
दि. 18 जानेवारी, 2023 रोजी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमासाठी कृषि विद्या, कृषि वानिकी आणि वातावरण बदलाचे नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. एस. भास्कर, मोदीपूरम येथील भारतीय शेती पध्दती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए.एस. पनवार हे उपस्थित राहणार असून दि. 21 जानेवारी, 2023 रोजी होणाऱ्या समारोप कार्यक्रमासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे उपमहासंचालक डॉ. एस.के. चौधरी उपस्थित राहणार आहे. या कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार आणि कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती एकात्मिक शेती पध्दतीचे प्रमुख कृषि विद्यावेत्ता डॉ. उल्हास सुर्वे यांनी दिली.

Related Articles

Back to top button