राजकीय

नाशिक पदवीधर मतदार संघातील छत्रपतींच्या मावळ्यावर विश्वास दर्शवा-आशिष कानवडे

संगमनेर शहर – नाशिक पदवीधर मतदार संघातील ज्या उमेदवारावर छत्रपती संभाजीराजे यांनी विश्वास दर्शवला त्या उमेदवारावर आपण सर्वांनी विश्वास टाकून स्वराज्यचा पहिला मावळा सुरेश पवार यांच्या रूपाने विधानपरिषदेत पाठवावा असे मत व्यक्त करताना इंजी. आशिष कानवडे पुढे म्हणाले की, स्थानिक उमेदवाराशी आपले कुठलेही वैयक्तिक वाद नाहीत. पण स्वराज्य चे विचार व छत्रपतींचा आशीर्वाद मिळालेला उमेदवार आपल्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
नाशिक विभाग पदवीधर निवडणूकीत स्वराज्य संघटनेचे अधिकृत उमेदवार सुरेश भीमराव पवार यांच्या प्रचारार्थ स्वराज्य प्रवक्ते प्रदेश संपर्क प्रमुख करण गायकर यांच्या आदेशानुसार संगमनेर येथे स्वराज्य निमंत्रक इंजि. आशिष कानवडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. नाशिक पदवीधर मतदार संघात अनेक घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर संगमनेर येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली व निवडणुकीचे अंतिम दिवसाच्या प्रचाराची योजना आखली गेली. बैठकीत मार्गदर्शन करत असताना आशिष कानवडे यांनी उमेदवारांची पार्श्वभूमी समजून सांगितली. यावेळी प्रस्ताविक जादूगार के भागवत यांनी केले तर आभार प्रदर्शन संदिप राऊत यांनी केले. यावेळी तरुण, विद्यार्थी वर्ग, जेष्ठ शिक्षक, महिला मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button