अहमदनगर

राहुरी येथे महिलांसाठी सकस आहार व तिरंगा थाळी स्पर्धेचे आयोजन

राहुरी : महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र, राहुरी यांच्या वतीने राहुरी शहरातील श्री संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात तिरंगा थाळी स्पर्धा व आंतरराष्ट्रीय तृण धान्य महोत्सव निमित्त तृण धान्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्यालयाचे उपजिल्हा समन्वयक अधिकारी सुनील पैठणे, श्रीरामपूर कृषी विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मीनाक्षी बढे, डॉ. माधुरी राऊत, सीएमआरसी अध्यक्ष श्रीमती पुष्पाताई धनवटे, राहाता सीएमआरसी अध्यक्ष राजश्रीताई डांगे, बार्टीचे एजाज पिरजादे, सीएमआरसी व्यवस्थापक महेश अबुज, तालुका सहाय्यक कृषी अधिकारी श्री आंधळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी सुनिल पैठणे यांनी महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महिलेने सकस आहार सेवन करावा, असा मोलाचा सल्ला दिला. ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य चांगले मिळावे यासाठी मविम तर्फे आरोग्य कार्ड तसेच आरोग्य तपासणी केली जात आहे असे सांगितले. तसेच रेसिपीव्दारे महिलांना प्रत्येक कडधान्ये, पालेभाज्या चा उपयोग आरोग्यासाठी करण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. मीनाक्षी बढे यांनी पंतप्रधान अन्न सूक्ष्म प्रक्रिया योजनाची माहिती उपस्थित महिलांना दिली. डाॅ. माधुरी राऊत यांनी महिलांना आरोग्याबाबत माहिती दिली. बार्टीचे समतादूत पिरजादे एजाज यांनी बार्टी व समाजकल्याण तर्फे राबविण्यात येणारे विविध योजना व प्रकल्प विषयी माहिती दिली. 
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तेजस्विनी सह्योगिनी शबनुर शेख, कल्पना काळे, वैशाली धसाळ, मनिषा वाडकर, लेखापाल उमेश खरात, उपजीविका सल्लागार अक्षय थोरात, भारती देशमुख, वंदना आल्हाट, योगिता चुंबळकर, भाग्यश्री कुसमुडे, संगिता ठोंबरे, हिना शेख, अश्विनी चव्हाण, वैष्णवी खरात, प्रतिभा दंडवते आदींनी सहकार्य केले. यावेळी स्पर्धेत प्रथम क्रमांक अश्विनी खरात, द्वितीय क्रमांक मिनाक्षी भोर, तृतीय क्रमांक चंद्रकला पवार व उत्तेजनार्थ असे चार पारितोषिके देऊन स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास कार्यकारिणी मंडळ व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button