अहमदनगर

पतसंस्थेच्या माध्यमातून समाजसेवा घडावी – डॉ.नामदेव महाराज शास्त्रीजी

श्री संत भगवान बाबा पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
राहुरी | अशोक मंडलिक : जनतेची गरज ओळखून समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून श्री संत भगवान बाबा पतसंस्था दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करुन जनतेच्या प्रेमातून उतराई होत असल्याचे गौरवोद्गार श्री क्षेत्र भगवान गडाचे गुरुवर्य डॉ. नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी काढले.
राहुरी तालुक्यातील अग्रगण्य असणारी श्री संत भगवान बाबा पतसंस्था दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करत असते. यावर्षीही पतसंस्थेने नवीन वर्षीची दिनदर्शिका प्रकाशित केली. या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच श्री क्षेत्र भगवानगड येथे गुरूवर्य महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे संस्थापक चेअरमन दिलीपराव आघाव आणि त्यांचे सहकारी गरजूंना पतसंस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याबरोबरच आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून दिनदर्शिका प्रकाशित करुन जनतेची गरज पूर्ण करत असल्याचे गौरवोद्गार डॉ नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी काढले.
यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन दिलीपराव आघाव, संचालक विक्रम खेडकर, लक्ष्मणराव आघाव, अंजाबापू आघाव, बाबासाहेब आव्हाड, संस्थेचे मॅनेजर अजय आघाव तसेच संचालक मंडळ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button