राजकीय

स्वराज्य प्रणित छावा क्रांतिवीर सेना घुलेवाडी ग्रामपंचायत निवडणुक लढवणार

संगमनेर शहर : तालुक्यातील ३७ गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजतातच स्वराज्य प्रणित छावा क्रांतिवीर सेना संघटनेची बैठक घुलेवाडी येथे पार पडली. या बैठकीत घुलेवाडी ग्रामपंचायत निवडणुक लढवुन संघटनेची ताकद दाखवण्याची हीच वेळ असल्याचे स्पष्ट संकेत नगर जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांनी दिले आहे.
या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना आशिष कानवडे यांनी सांगितले की, संघटनेची ताकद आजमवण्याची हीच वेळ आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप राऊत यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून घुलेवाडी ग्रामपंचायत गलथान कारभाराबाबत काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण आंदोलन केले. हे आंदोलन यशस्वी ही झाले, सातत्याने गावात सामान्य माणसांसाठी लढत आहे. सरपंच पद महिला राखीव असल्याने संदिप राऊत यांच्या पत्नी भाग्यश्री राऊत या सरपंच पदाची निवडणुक संस्थापक अध्यक्ष व स्वराज्य प्रवक्ते करणभाऊ गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार असल्याची घोषणा तालुकाध्यक्ष संदिप राऊत यांनी केली. तसेच इतर जागांसाठी मोर्चे बांधणी करणार असल्याचे सांगितले. राजकीय पक्षांना एक सक्षम पर्याय निर्माण करायचा म्हणुन ही निवडणुक लढवायची असे तालुकाध्यक्ष संदिप राऊत यांनी सांगितले.
यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजश्री वाकचौरे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष रविंद्र डूबे, तालुका उपाध्यक्ष सचिन गांजवे, वि.आघाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मण सातपुते, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष नवनाथ राऊत, कलाकार आघाडी तालुकाध्यक्ष भागवत कानवडे, तालुका संपर्क प्रमुख गणेश फरगडे, सरचिटणीस सचिन कानवडे, दत्ता शेटे, आशिष गवळी, महेश मुर्तडक, राहुल राऊत, प्रदीप राऊत, रविंद्र ढमाले, संदिप पानसरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button