उत्तर महाराष्ट्र

नासिक येथे पेन्शनर मेळावा उत्साहात

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वा. श्रीकृष्ण गार्डन, छत्रपती संभाजी स्टेडियम मागे पाथर्डी फाटा, नाशिक येथे अतिशय उत्साहात ईपीएस पेन्शनर मेळावा संपन्न झाला. मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ पेन्शनर के.के.देशपांडे होते. प्रास्ताविक जिल्हा सचिव अरुण शेजवळ यांनी केले. सुत्रसंचलन जिल्हा उपाध्यक्ष कैलास आहेर यांनी केले.
मेळाव्यास औद्योगिक क्षेत्रातील पेन्शनरांची उपस्थिती लक्षणीय होती. शिरीष भावसार (महिंद्रा अँड महिंद्रा), प्रकाश सोनवणे (VIP), अरविंद कुलकर्णी, पांडुरंग कुलकर्णी (मर्चंट बँक), वाजे यांनी चर्चेत सहभागी होऊन मनोगत व्यक्त केले. संगमनेर तालुका उपाध्यक्ष सुलेमान शेख यांनी उपस्थितांना राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर साहेबांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले. पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभर चालू असलेल्या आंदोलनाची माहिती देवून, कमित कमी पेन्शन दरमहा रु ७५००/ व निगडित महागाई भत्ता हे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले. मा. सुप्रीम कोर्ट निर्णयावर सविस्तर भाष्य करुन ईपीएफओ काय व कसा निर्णय घेईल यांवर अवलंबून राहावे लागणार आहे
या स्किम मधील पेन्शन धारकांच्या हिताचे अनेक निर्णय बदलल्याबद्दल कामगार संघटनेचे प्रतिनिधी सीबीटी मध्ये काय करत होते? त्यामुळे आज ही दयनीय अवस्था झाली आहे. यापूढे संघटीतपणे कमांडर यांचे पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले. ग्राम संघर्ष समिती व वार्ड / सोसायटी वार समिती स्थापन करण्याची विनंती केली. सभा अध्यक्ष देशपांडे यांनी सर्वांना संघटना बळकट करण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कामगारांचे ठेकेदार म्हणवून घेणाऱ्यांनी पेन्शनरांची फसवणूक केली. यासाठी जागृत होवून NAC सोबत राहणेचे आवाहन केले. जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निर्मला वाघ, महाजन यांचे सह मोठ्या संख्येने पेन्शनर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button