उत्तर महाराष्ट्र

पळसून येथे आदिवासी उपयोजने अंतर्गत कृषि निविष्ठा वाटप कार्यक्रम संपन्न

नंदुरबार : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि किटकशास्त्र विभागाच्या अखिल भारतीय सूत्रकृमी संशोधन योजनेमार्फत आदिवासी उपयोजनेतून पळसून, ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे सायकल कोळपे, ट्रायकोडर्मा प्लस-जैविक किडनाशक व कृषिदर्शनी या कृषि निविष्ठांचे मोफत वाटप आदिवासी शेतकरी बाधवांना करण्यात आले.

सदर कार्यक्रम भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी अदिवासी उपयोजनेसाठी मंजुर केलेल्या विशेष निधीतून विस्तार शिक्षण संचालक व किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी.एस. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या प्रसंगी शेतकर्यांना विविध पिकांवर होणार्या सुत्रकृमींच्या प्रभावी नियंत्रणाबाबतचे मार्गदर्शन किटकशास्त्र विभागांतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित सुत्रकृमी संशोधन योजनेतील सहाय्यक सूत्रकृमी शास्त्रज्ञ डॉ. पल्लवी पाळंदे यांनी केले.

या कार्यक्रमाला संशोधन सहयोगी विनोद पवार, हरिचंद्र भुसारी, पळसून गावचे सरपंच, उपसरपंच व आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच संतोष कोकणी यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अ.भा.स. सुत्रकृमी संशोधन योजना व भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांचे आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button