अहमदनगर

दिशा मोरे हिचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते शिष्यवृत्ती सन्मान

क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि.च्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ग्रामीण कोटा मायक्रो फायनान्स च्या वतीने सन 2021 -22 मध्ये दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये पुणतांबा येथील दिशा हेमंत मोरे हिला शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे हस्ते देण्यात आले. दिशा ही नागपूरला नीट क्लासेससाठी गेली असल्याने सन्मानपत्र तिच्या पालकांनी स्वीकारले.
गुणवंत विद्यार्थिनींना संस्थेच्या वतीने नुकतेच अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. दिशा हेमंत मोरे रा.पुणतांबा ता. राहाता जि. अ.नगर, प्रणाली संजय कल्हापुरे रा,खडांबे ता, राहूरी जि, नगर या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास कंपनीचे अधिकारी सुधीर लोने, विभागीय अधिकारी दिपक राऊत, क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह पालकांमधून सौ. अनिता संजय कलापुरे, सौ .मनीषा हेमंत मोरे आदी उपस्थित होतेे. यावेळी जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून संस्थेच्या उपक्रमाची प्रशंसा केली.

Related Articles

Back to top button