अहमदनगर

सचिन गुलदगड यांना महात्मा फुले समता पुरस्कार

नगरमहात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्ताने क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांना माळीवाडा येथे महात्मा फुले समता पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांना महात्मा फुले समता पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारामध्ये सचिन गुलदगड यांना मानपत्र, शाल, फेटा आदिंच्या स्वरुपात हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी समितीचे अध्यक्ष माणिकराव विधाते, सचिव अशोकराव कानडे, पंडीतराव खरपुडे, श्री संत सावता माळी युवक संघाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जाधव, आमित खामकर, जालिंदर बोरुडे, दिपक खेडकर, किरण जावळे, सौ.रेणुका पुंड, बेबीताई गायकवाड, नितीन डागवाले, गणेश बोरुडे, प्रकाश भागानगरे, उद्धव शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button