औरंगाबाद

प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे- सपोनि नागरगोजे

उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामस्थांकडुन नागरगोजे यांचा नागरी सत्कार 
विलास लाटे | पैठण : अनेकदा आपण पाहतो गुन्हा अथवा घटना घडल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यासाठी कुणी लवकर पुढे येत नाही. यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढते, परीणामी गुन्हेगारी फोफावते. गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरीकांनी आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना कळवून सहकार्य करणे गरजेचे आहे. तरच गुन्हेगारीला आळा बसेल. यासाठी प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे, असे प्रतिपादन पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी केले.
सपोनि नागरगोजे यांनी रुजु झाल्यानंतर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरी, खुन अशा विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा उलगडा करुन आरोपींना पिंजऱ्यात डांबून चोखपणे कर्तव्य बजावत समाजात एक वेगळी छाप पाडली. यामुळे गुन्हेगारीला आळा बसला. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पैठण तालुक्यातील टाकळी येथे मंगळवारी (दि.११) एमआयडीसी पोलिसांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान याप्रसंगी सपोनि नागरगोजे, बिट जमादार कर्तारसिंग सिंघल, कृष्णा उगले आदीं पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वांनी जबाबदारी घेवुन काम करणे गरजेचे आहे. नेहमी चांगले काम करणाऱ्याला साथ द्यावी. शक्यतो वादविवाद टाळावा. भांडणामुळे कधीच कुणाचं भले झाले नाही. वादविवाद टाळून एक विचाराने मार्ग काढावा. कौटुंबिक प्रगती बरोबर सामाजिक प्रगतीसाठी प्रत्येकाने आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही असे वागले पाहिजे. त्याचबरोबर मुलांना चांगले शिक्षण व संस्कार द्या. स्वच्छता राखा, रोगराई टाळा असा मौलिक सल्ला देखील त्यांनी दिला. शेवटी सत्काराबद्दल ग्रामस्थांचे आभार मानत यापुढेही चांगली सेवा देण्यासाठी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक विजय गोरे, सरपंच महेश सोलाटे, माजी उपसरपंच कडुबाळ सुसे, गंगाधर जाधव, उपसरपंच आप्पासाहेब जाधव, सिताराम सोलाटे, विठ्ठल सोलाटे, भानुदास लाटे, शेषराव सोलाटे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जामदार, अशोक लाटे, रघुनाथ जाधव, गोपीचंद लाटे, निजाम शेख, चंद्रहार लाटे, कल्याण भालेकर, बबन लाटे, सदाशिव काळे, सिताराम मावस, नारायण काळे, नितीन जाधव, अशोक जामदार, शिवनाथ जाधव, लक्ष्मण ठोंबरे, गोरख जाधव, पांडुरंग सोलाटे, म्हसु जाधव, अशोक गोरे, अजय भालेकर, आसाराम ठोंबरे, एकनाथ लाटे, ज्ञानेश्वर बोंबले, आत्माराम सोलाटे, भाऊसाहेब नरवडे, रामराव वाघमारे, योगेश मोहिते, योगेश सोलाटे, लेहाज शेख, सिराज सय्यद, बबन निळ, भानुदास काळे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक कडुबाळ सुसे यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Back to top button