औरंगाबाद

स.भु.प्रशालेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

विलास लाटे | पैठण : तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक रंगनाथ हिवाळे, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य, मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, शालेय समितीचे जेष्ठ सदस्य डॉ. अंताराम धरपळे, मानद मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, विलास सोनजे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक रंगनाथ हिवाळे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. संगित विभाग प्रमुख दिनेश संन्यासी यांच्या मार्गदर्शनाखाली स.भु.गीतमंचाने, ‘ही मराठवाडा भूमी, गाऊ तिच्या गुणाला’ हे कवयित्री रेखा नाथ्रेकर यांचे मराठवाड्याचे गौरव सांगणारे गीत अतिशय सुरेल आवाजात सादर केले. यावेळी प्रा. सुदाम चिंचाणे यांचे मराठवाडा मुक्तीसंग्राम याविषयावर अतिशय अभ्यासपूर्ण भाषण झाले. शालेय समितीचे जेष्ठ सदस्य डॉ.आंताराम धरपळे, मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले. विजय गव्हाळे, स्नेहल फासाटे या विद्यार्थ्यांने काढलेल्या अतिशय सुंदर अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी, पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्केचचे विमोचन प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. कलाशिक्षक अनिल साबळे, तुषार अहिरे यांनी अतिशय सुरेख असे फलक लेखन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला गायधने यांनी तर आभार जगन्नाथ राऊत यांनी मानले.

Related Articles

Back to top button