अहमदनगर

पंचायत समिती वतीने श्रीरामपूर शहरात आझादी का अमृत महोत्सव

श्रीरामपूर| बाबासाहेब चेडे : आझादी का अमृत महोत्सव सोहळा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. श्रीरामपूर पंचायत समिती शिक्षण विभागाने हर घर तिरंगा हर मन तिरंगा या अभियानाअंतर्गत समाज प्रबोधनपर मुक्त करूया भारत माता पथनाट्य श्रीरामपूर शहरात चौका चौकात सादर करण्याचा उपक्रम हाती घेतला, हि बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.
स्वतंत्र भारताच्या 75 वर्ष पूर्ती निमित्त भारतीय संस्कृती आणि सामाजिक, धार्मिक, आर्थिक, अंधश्रद्धा, मुलगा/मुलगी समानता, मोबाईलचा अतिवापर, व्यसनमुक्ती या विषयावर मार्मिक भाष्य करताना समाजाला प्रबोधना बरोबरच उपाययोजना सुध्दा सुचवून प्रेक्षकांना आकर्षित करुन मंत्रमुग्ध करणारी सुबक कलाकृती सादर केली. श्रीरामपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षिका, पंचायत समिती शिक्षण विभागातील कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांचे कौतुक केले. नक्कीच कौतुकास त्यांनी देशाप्रती व विद्यार्थ्यांप्रती निरंतर निष्ठा राखण्याची जबाबदारी पार पाडली असे प्रतिपादन आ.लहुजी कानडे यांनी पथनाट्य शुभारंभ प्रसंगी केले.
महात्मा गांधी चौकात पथनाट्य शुभारंभ प्रसंगी श्रीरामपूर चे प्रांताधिकारी तथा प्रशासन अधिकारी अनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस, गटशिक्षणाधिकारी सौ.साईलता सामलेटी, रयत शैक्षणिक संकुलाच्या चेअरमन मिनाताई जगधने, माजी नगरसेवक अशोक कानडे, नगरसेवक अंजुमभाई शेख, अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, पंचायत समिती माजी सभापती सौ.वंदना मुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी सर्व मान्यवरांसमोर पथनाट्य सादर केले. त्यानंतर भगतसिंग चौक यां ठिकाणी प्रेक्षकांसमोर भर पावसात शिक्षक व शिक्षिका यांनी पथनाट्य सादर करून प्रेक्षकांची पसंती मिळवली. तदनंतर मौलाना आझाद चौक (वेस्टर्न चौक) या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्यात आले. प्रेक्षकांचा प्रतिसाद पथनाट्याची उंची वाढवत होते. पथनाट्याच्या केंद्रस्थानी असलेल्या भारतमाता आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या. अनेक प्रेक्षकांनी भारतमातेसमवेत फोटो सेशन केले. यावरुनच पथनाट्याची यशस्वीता सिध्द झाली.
श्रीरामपूर तालुक्यातील शिक्षक व शिक्षिका यांच्या साठी थत्ते मैदानावर विशेष सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक प्रसंग उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा व हदय,काळीज पिळवटून टाकणारा ठरला. थत्ते मैदानावरील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल भविष्यात यांचे विविध ठिकाणी प्रयोग सादरीकरण करण्यात यावे अशी सर्वांनीच अपेक्षा व्यक्त केली. समाजप्रबोधनपर पथनाट्याची संकल्पना व मार्गदर्शन श्रीरामपूरच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांची होती. त्याबरोबरच त्यांनी स्वतः पथनाट्या मध्ये महत्वाची भूमिका साकारली व शिक्षकांना प्रोत्साहित केले. संपूर्ण सादरीकरण व पथनाट्य करिता संजय साळवे सर यांचे मोलाचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button