अहमदनगर
अमृत महोत्सव सोहळ्यात वृक्षारोपण
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील फातेमा हौसिंग सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने प्रभाग क्र.१ मध्ये केनॉल रोडला प्रांत अधिकारी अनिल पावर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी प्रांताधिकारी यांनी सदर कार्यक्रमाची प्रशंसा करताना म्हटले की, हा वेगळा कार्यक्रम वृक्षारोपणाला प्रेरणा देणारा ठरणार आहे. सदर कार्यक्रमावेळी श्रीरामपूर पालिकेचे मुख्याधिकारी शिंदे प्रशासकीय अधिकारी तसेच जॉगिंग ट्रेक कमेटीचे अध्यक्ष अकिल सुन्नाभाई, आसिफ भाई, नजीरभाई शेख, एस.के.खान, तनवीर शेख, इसरारभाई, बुरहान जमादार, नासिरभाई, राशेदभाई आदी हजर होते. या प्रसंगी जॉगिंग ट्रेक कमेटीच्या वतीने वरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.