औरंगाबाद

क्रिडा शिक्षक किशोर नांवकर आदर्श क्रिडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित

विलास लाटे | पैठण : तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेचे विद्यार्थी प्रिय क्रीडा शिक्षक किशोर नांवकर यांना औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे व ऑलिम्पिक तथा अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तु भोकनळ, जीवनगौरव पुरस्कार प्राप्त रमेश भंडारी यांच्या हस्ते औरंगाबाद येथे देण्यात आला.
यावेळी ऑलिम्पिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष डॉ. उदय डोंगरे, सचिव गोविंद शर्मा, सहसचिव दिनेश वंजारे, विश्वास जोशी, कमांडर विनोद नरवडे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. दयानंद कांबळे, डॉ.मकरंद जोशी, अमृत बि-हाडे, डॉ. संदिप जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. किशोर नांवकर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर साहसी खेळ प्रकारातील मार्गदर्शक असून त्यांना गिर्यारोहणाची विशेष आवड आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य, मुख्याध्यापक मनोहर चित्तोडकर, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, शालेय समितीचे जेष्ठ सदस्य डॉ.मिलिंद कोनार्डे, मच्छिंद्र पाटील हाडे, किसनलाल तोतला, डॉ. अंताराम धरपळे, दामु पाटील डुबे, बबनराव ठाणगे, संजय दौंडेसह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button