राजकीय

पुन्हा संधीसाधू बाशिंग बांधून; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारीला

संगमनेर प्रतिनिधी : येत्या काही महिन्यावर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका प्रक्रिया चालू होतील. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात कोरोना काळात गायब झालेले बुरखे पुढारी आता उदघाटन, आखाड पार्टी मध्ये दिसून आले. काहींना पुन्हा एकदा स्वप्ने पडायला लागली आहे. पण आता तरुणांनी, नागरिकांनी वेळीच हुशार व्हायला पाहिजे. कोरोना सारख्या महामारीत ज्यांनी गोरगरिब जनतेकडे पाठ फिरवली, दिलेल्या आश्वसनाचा विसर पडला. अश्या नेत्याला सत्ता भोगण्यापासून वंचित ठेवून नवीन सुशिक्षित तरुणांकडे संधी द्यायला हवी. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या की कौटूंबिक धागेदोरे शोधायला तयार आता सुजाण तरुणांनी त्यांच्या आश्वसनाला बळी न पडता नवीन तरुणांकडे आशेचा किरण म्हणून पाहिलं पाहिजे. येत्या काळात सर्वसमावेशक नेतृत्व, सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व पाहिजे असेल तर चार चाकीची खिडकी न उघडता फिरणाऱ्या पांढरपोश्या नेत्याला घरी बसवून सर्व सामान्य तरुणाला संधी दिली पाहिजे, तो ज्या पक्षाचं काम करतो त्या पक्षाने जनमताचा आदर करून त्याला संधी देऊन त्याला त्याच व्हिजन जनते पुढे आणू दिल पाहिजे, त्या तरुणांकडे विकासाचे व्हिजन असेल तर त्याला कोणीही निवडून येन्यांपासून रोखू शकतं नाही, तालुक्यात सर्वसामान्य कार्यकर्त्याची राजकारणात गरज आहे. कारण की एकाच घरातील प्रस्थापित लोक अनेक वर्षे पद भोगत आहेत, का कोणता नेता विचार करत नाही की आता आपण थांबलं पाहिजे (अपवाद वगळता) आणि इतरांनाही संधी दिली पाहिजे, पण नाही त्यांचे पोट मोठे असल्यामुळे ते भरत नाही, त्यामुळे तालुक्यातील सुजाण तरुणांनी अश्या नेत्या विरुद्ध दंड थोपटून सर्व सर्वसामन्याला संधी दिली पाहिजे.
               इंजि.आशिष कानवडे
            (आशिष बिल्डकॉंन, संगमनेर)
                   7028456005

Related Articles

Back to top button