सामाजिक

श्रीराम पायी दिंडीच्या वतीने पूरग्रस्तांना आर्थिक मदत

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : श्रीराम पायी दिंडी श्रीक्षेत्र कारेगाव ते पुणतांबा दिंडीचे शिरसगाव येथे अशोक रासकर यांचे वस्तीवर भव्य स्वागत करण्यात आले. दिंडीचे नेतृत्व अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे यांचेसह नामदेव महाराज उंडे, भाऊसाहेब आढाव, राजेंद्र उंडे हे करीत आहेत.
जुलै २०२२ मध्ये आपल्या महाराष्ट्रात मान्सून पावसाने थैमान घातले असून अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक बांधव बेघर झालेले आहे. त्यांच्या मदतीसाठी वारकरी बंधू भगिनी यांनी खारीचा वाटा उचलून वर्गणीतून पूरग्रस्त यांना मदत देण्याचा निर्णय झाला.
त्याप्रमाणे दिंडीतील वारकरी व शिरसगाव येथील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव रासकर आदींनी ७०२१ रु मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश शिरसगाव कामगार तलाठी बाबासाहेब कदम यांना व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, अशोकराव रासकर यांच्या हस्ते व सोसायटी चेअरमन किशोर पाटील, दिनकरराव यादव, नामदेव उंडे, बाळासाहेब बोंबले आदी सर्व मान्यवर व वारकरी यांच्या उपस्थितीत देण्यात आला. या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button