महाराष्ट्र

पर्यावरण संवर्धनासाठी माजी सैनिकांनी घेतलेला ध्यास दिशादर्शक -आमदार मोनिकाताई राजळे

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व जय हिंद वृक्ष बँकच्या वतीने माजी सैनिकांनी लावले मोहटादेवी मंदिराच्या गडावर १११ वडाचे झाड

अहमदनगर प्रतिनिधी : माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व जय हिंद वृक्ष बँकच्या वतीने तिर्थक्षेत्र मोहटादेवी मंदिर (ता. पाथर्डी) गडाच्या परीसरात १११ वडाचे झाड लावण्यात आले. जगदंबा मोहटादेवी वनराई उभारण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते वृक्षरोपणाने करण्यात आला.    
   या वृक्षरोपण कार्यक्रमाप्रसंगी सभापती विष्णुपंत अकोलकर, गोकुळ दौंड, पंचायत समिती सदस्य सुनिल ओव्हळ, सुभाष केकाण, माजी सभापती नवनाथराव आव्हाड, शेवगाव-पाथर्डीचे प्रांतअधिकारी देवदत्त केकाण, जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, मोहटादेवी देवस्थानचे विश्‍वस्त आजिनाथ आव्हाड, भिमराव पालवे, अशोक वि. दहिफळे, अशोक भ. दहिफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, कोल्हारचे सरपंच शिवाजी पालवे, निवृत अधिकारी लक्ष्मण गिते, विष्णु गिते, नवनाथ पालवे, वाळुंजचे सरपंच रणजित बेळगे, अकोलेचे उपसरपंच अर्जून धायतडक, जय हिंद वृक्ष बँकेचे शिवाजी गर्जे आदी उपस्थित होते. आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, पर्यावरण संवर्धनासाठी माजी सैनिकांनी घेतलेला ध्यास दिशादर्शक आहे. देश रक्षणाचे कर्तव्य बजावणारे सैनिक सेवानिवृत्तीनंतर पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढत असल्याचे पाहून त्यांच्याप्रती अभिमान वाटत आहे. माजी सैनिकांनी सुरु केलेली वृक्ष रोपण व संवर्धनाची मोहिम ही लवकरच लोकचळवळ म्हणून उदयास येणार आहे. जिल्ह्यातील डोंगररांगा हिरवाईने फुलवण्यासाठी माजी सैनिकांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.   
शिवाजी पालवे यांनी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व जय हिंद वृक्ष बँकच्या माध्यमातून जिल्ह्यातील डोंगररांगा व ओसाड भाग हिरवाईने फुलविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. ऑक्सिजन देणारी देशी झाडे लावण्यात येत असून, टाळेबंदीतही माजी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात झाडे लावून ती जगवली असल्याची माहिती दिली. सभापती विष्णुपंत अकोलकर यांनी भविष्यात मोहटादेवी गड या वृक्षरोपण अभियानाने हरित होणार आहे. यामुळे गडाची शोभा वाढणार असून, निसर्ग सौंदर्य लाभून भक्तांचे मन देखील प्रसन्न होणार असल्याचे सांगितले. मोहटादेवी देवस्थानच्या विश्‍वस्तांनी माजी सैनिकांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच यावेळी शिवदास दहिफळे, सुनिल दहिफळे, गहिनीनाथ दहिफळे, शिवाजी पठाडे, अशोक मुठे, संजय मुठे, अरविंद ढवळे, साई बालाजी प्रतिष्ठानचे संतोष आव्हाड, सेवाश्रय फाउंडेशनचे पोपटराव फुंदे, जलमित्र संतोष दहिफळे, अविनाश फुंदे, महादेव दहिफळे, संगिता बुधवंत, अनुराधा फुंदे, बाबाजी पालवे, दिपक आवंतकर, पांडूरंग दहिफळे, भिमराव खाडे, म्हातारदेव मुळे, गंगा सुपेकर आदिंसह ग्रामस्थ व माजी सैनिक उपस्थित होते. आभार शिवदास दहिफळे यांनी मानले.

Related Articles

Back to top button