अहमदनगर

मुख्यमंत्री जलजीवन योजनेअंतर्गत ओझर खुर्द येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

संगमनेर प्रतिनिधी : महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री जलजीवन योजनेअंतर्गत ओझर खुर्द येथील नळ पाणीपुरवठा (68 लक्ष) योजनेचे भूमिपूजन समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख व कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
     यावेळी जि.प.सदस्य शांताबाई खैरे, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, कारखान्याचे संचालक गिताराम शिंदे, शिर्डी विधानसभा काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश थोरात,उपसरपंच संदीप नागरे, गबाजी खेमनर , जयवंत थोरात, भाऊसाहेब बाबुराव साबळे, ओझर खुर्दचे सरपंच पुंजाहरी शिंदे, रहिमपूर चे सरपंच बाजीराव शिंदे, महिला कार्यकर्त्या दिपाली वर्पे, ओझर खुर्द चे ग्रामपंचायत सदस्य बकुनाथ साबळे, बाबासाहेब बनवाले, शांताराम कदम, पाराबाई शेपाळ, आदिंसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button